ऊस तोडणी करतानाआढळली बिबट्या ची तीन पिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:23+5:302021-03-10T04:12:23+5:30
ओतूर वनपरिक्षेत्रातील वडगाव कांदळी येथे ऊसतोडणी करताना बिबट्याची तीन पिले आढळली. ओतूरचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके यांच्याशी संपर्क साधला असता ...
ओतूर वनपरिक्षेत्रातील वडगाव कांदळी येथे ऊसतोडणी करताना बिबट्याची तीन पिले आढळली. ओतूरचे वनक्षेत्रपाल योगेश घोडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले--
वडगाव कांदळी ता जुन्नर याठिकाणच्या मुटके मळ्यातील निवृत्ती मुटके यांच्या शेतामध्ये ऊस तोडणीचे काम चालू असताना संध्याकाळी मजुरांना बिबट्याची तीन पिल्ले आढळली. याबाबत शेतकरी मुटके यांनी याबाबत ताबडतोब वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर जुन्नरचे वन परिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली माणिक डोह निवारा केंद्रातील कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर सहाय्यक पशुवैद्यक महेंद्र ढोरे ओतूरचे वन कर्मचारी कैलास भालेराव व सचिन मोडवे या सर्वांनी याठिकाणी येऊन पाहणी केली .त्यानंतर डॉक्टर बनगर यांनी बिबट्याच्या पिल्लांची आरोग्य तपासणी केली. याबाबत माणिक डॉ निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी निखिल बनगर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की याठिकाणी सापडलेल दोन महिन्याची तीन पिल्ले पैकी दोन नर एक मादीअसून ज्या ठिकाणी पिल्ले सापडली होती त्या ठिकाणी पिल्लांना सुरक्षित ठेवण्यात आले .बरोबर सात वाजता बिबट मादीने आपल्या पिल्लांना बरोबर घेऊन नैसर्गिक अधिवासात प्रस्थान केले.
बिबट्याची पिले फोटो .