मांडूळाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक,विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 02:36 PM2018-03-24T14:36:40+5:302018-03-24T14:36:40+5:30
पोलीस कर्मचारी शेखर खराडे यांना धानोरी परिसरात तीन व्यक्ती मांडूळाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
विमाननगर- मांडूळाची विक्री करण्यासाठी उस्मानाबाद येथून आलेल्या तिघांना विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. वनविभागाच्या वनरक्षक दया डोमे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. डोमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार,विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी योगेश शिवाजी अवसरे(वय२३),समाधान संजय गोडगे (वय२७),पांडुरंग धुळदेव डाकवाले(वय३२,तिघेही रा.परांडा,उस्मानाबाद)या तिघांना सापळा रचून अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी शेखर खराडे यांना धानोरी परिसरात तीन व्यक्ती मांडूळाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार,धानोरी शंभर एकर परिसरात एका स्कॉर्पिओ गाडीत तीन संशयित इसम मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक तपासात त्यांच्या गाडीत सुमारे साडे तीन फूट लांबीचा मांडूळ मिळून आला.परिमंडळ ४चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे, पोलीस निरीक्षक संगिता पाटील, गुन्हे निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीविशाल मोहिते, उत्तम कदम, सुनील खंडागळे, विनायक रामाणे, शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे, अशोक शेलार यांच्या पथकाने आरोपींना शिताफीने अटक केली.