पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तिघांना अटक
By admin | Published: October 18, 2015 12:19 AM2015-10-18T00:19:22+5:302015-10-18T00:19:22+5:30
गावठी पिस्तूल घेऊन रात्रीच्या वेळी रस्त्याने फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना शिक्रापूर पोलिसांनी तळेगाव ढमढेरे येथे पाठलाग करून अटक केली.
शिक्रापूर : गावठी पिस्तूल घेऊन रात्रीच्या वेळी रस्त्याने फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना शिक्रापूर पोलिसांनी तळेगाव ढमढेरे येथे पाठलाग करून अटक केली.
अक्षय काळुराम भुजबळ (वय १७, रा. सणसवाडी, ता. शिरूर), संकेत पांडुरंग तांबीले (वय १७, रा. विठ्ठलवाडी, ता. शिरूर) व आकाश मधुकर हरगुडे (१९, रा. सणसवाडी, ता. शिरूर) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांची गस्त सुरू असताना तीन युवक दुचाकीवरून विठ्ठलवाडी येथून निघाले होते. एका हातात गावठी पिस्तूल उंचावत हे तिघे फिरत होते. दिवाळी असल्याने खोटे पिस्तूल असावे, असा पोलिसांचा अंदाज होता; परंतु त्यांचा पाठलाग केला असता ते वेगाने जाऊ लागले. तळेगाव ढमढेरे येथे गाडी घसरल्याने ते पडले व पाठलागावर असलेल्या पोलिसांच्या हाती लागले. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. (वार्ताहर)