दुर्दैवी घटना! भीमा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन परप्रांतीय अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 01:39 PM2023-10-08T13:39:35+5:302023-10-08T13:41:42+5:30
भीमा नदीत ६ जण पोहण्यासाठी गेले असता तिघे वाहून गेले
वरवंड : ता-दौंड तालुक्यातील हातवळण येथील गुऱ्हाळ वरती काम करणाऱ्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. दौंड तालुक्यातील हातवळण येथे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी तीन मुले वाहून गेल्याची घटना शनिवारी घडली होती. दरम्यान तिघांपैकी एकाचा मृतदेह शनिवारी सापडला असून दोन मुलांचा मृत्यूदेह अद्यापही सापडले नव्हते. मात्र ते शोधण्यासाठी ग्रामस्थ व पोलिस यंत्रणा कस लागला होता रविवारी सकाळी 10 च्या सुमारास बाकीचे दोन मृतदेह सापडले एक मृतदेह हातवळण दुसरा कानगाव हद्दीत सापडले.
भिमानदीत पोहोण्यासाठी गेलेले सहा पैकी तिघे वाहून गेले. विशाल दिलेराम सिंग ( वय १६), निखिल नरेशसिंग कुमार (वय १५) व अमित रामेश्वर राम (वय १६) मुळ रा. आदवपुर जि. बिजनौर )अशी या मुलांची नावे आहेत. दरम्यान, याबाबत मिळालेले माहिती अशी की, हातवळण येथील वसंत विठठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम भस्सु सिंग (वय ४५) यांचा मुलगा विशाल, भाचा निखिल, मेव्हणीचा मुलगा अमित, देव, निपिलकुमार व निरजकुमार असे सहा जण शनिवारी (दि ७) दुपारी हातवळण येथील भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यामधील तीघे जण नदीच्या पात्रात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच भिमा नदीच्या पात्रात यवत व पाटस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मासेमारी करणारे मच्छीमार यांच्या होडीतुन व ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांच्या मृतदेह शोध कार्य सुरू केले ,मात्र बराच वेळ शोध कार्य केल्यानंतर कु. अमित याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढुन मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले मात्र गेले डॉक्टरांनी अमित याला उपचारापुर्वी मृत झाल्याचे सांगितले. तसेच रविवारी विशाल व निखिल यांचा मृतदेह एकाचा हातवळण व दुसरा मृतदेह कांनगाव हद्दीत सापडला पोलीसांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्य ने भिमा नदीच्या पात्रातील मृतदेह बाहेर काढण्यात आले व हे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी यवत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पाटस पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार सागर चव्हाण,पोलीस हवालदार भालेराव ,तंटाक्तीअध्यक्ष मंगेश फडके ग्रामस्थ उपस्थितीत होते.