तीन अल्पवयीन मुलींचा अवघ्या ४८ तासात लावला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:58+5:302021-03-22T04:10:58+5:30

सासवड : पुरंदर तालुक्यातील धुमाळवाडी वीर येथील ऊस तोडीच्या कामासाठी आलेल्या कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात इसमाने ...

Three minor girls were found in just 48 hours | तीन अल्पवयीन मुलींचा अवघ्या ४८ तासात लावला शोध

तीन अल्पवयीन मुलींचा अवघ्या ४८ तासात लावला शोध

Next

सासवड : पुरंदर तालुक्यातील धुमाळवाडी वीर येथील ऊस तोडीच्या कामासाठी आलेल्या कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले ,बाबत सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच अवघ्या ४८ तासांच्या आत पीडित मुलींचा शोध लावण्यात आला .

सासवड पोलीस स्टेशनची कार्यतत्परतेमुळे या मुली आईवडिलांकडे सुखरूप स्वाधीन झाल्या आहेत. याबाबत पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आलेल्या सविस्तर माहिती नुसार या तीन अल्पवयीन मुली त्यांच्या आई-वडिलांसोबत धुमाळवाडी वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे ऊस तोडणी कामासाठी आल्या होत्या. त्यांना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले बाबत दिनांक १७ मार्च २०२१रोजी सायंकाळी पाच वाजता पीडित मुलींचे वडिलांनी तक्रार दिली होती. त्यानुसार सासवड पोलिसांच्या वतीने दोन तपास पथके नियुक्त करण्यात आली .दोन्ही तपास पथकांनी समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदर मुली ह्या भिवडी गावच्या हद्दीत सासवड भिवडी रोडच्या कडेला वीटभट्टीवर असल्याचे समजले . माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता या ठिकाणी पीडित मुली आढळून आल्या .त्यांना फूस लावून पळवून नेणार्‍या तीन इसमांना यावेळी ताब्यात घेण्यात आले. . पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप ,सहाय्यक पोलीस निरीक्षक आर .जे .माने , सुप्रिया दुरंदे ,पोलीस हवालदार अनिल खोमणे ,भरत आरडे, अशोक तौर , महेश उगले, गोकुळ हिप्परकर ,सुरज नांगरे, विक्रम भोर ,सचिन गायकवाड ,सुनील कोळी यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Three minor girls were found in just 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.