बेपत्ता तीन महिला भुसावळ येथे सापडल्या
By admin | Published: December 5, 2014 05:01 AM2014-12-05T05:01:45+5:302014-12-05T05:01:45+5:30
हिंजवडी येथून बेपत्ता झालेल्या तीन महिला सात दिवसांनी आज गुरुवारी सकाळी भुसावळ येथे सापडल्या. नोकरीच्या शोधार्थ येथे गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
पिंपरी : हिंजवडी येथून बेपत्ता झालेल्या तीन महिला सात दिवसांनी आज गुरुवारी सकाळी भुसावळ येथे सापडल्या. नोकरीच्या शोधार्थ येथे गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. यामुळे अपहरणाचा बनाव असल्याचे उघड झाले आहे.
या तिघी हिंजवडी येथील फेज २ जवळील ओझरकवाडी येथील गवारेवस्तीत आहेत. त्या एकमेकीच्या ओळखीच्या आहेत. प्रतिभा प्रकाश हजारे (वय २५, मूळ रा. बेळगाव), मंगला सिद्धार्थ इंगळे (वय २६, मूळ रा. वाशीम) व विद्या दरशथ खाडे (वय २४, मूळ रा. सातारा) या तिघी गेल्या शुक्रवारी (दि. २८) दुपारी दवाखान्यात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. हजारे या डीएलफ कंपनीत आणि खाडे या इन्फोसिस कंपनीत सुरक्षारक्षक आहेत. इंगळे या गृहिणी आहेत. त्या बेपत्ता झाल्यानंतर विद्या खाडे यांच्या मोबाईलवरून मंगला इंगळे यांनी पती सिद्धार्थ इंगळे यांना कॉल केला. लवकर या .. लवकर या... इतकेच बोलणे झाले. सायंकाळी पाचनंतर खाडे व हजारे यांचे मोबाईल बंद होते. त्यामुळे त्याचे मोबाईल लोकेशन मिळत नव्हते.
तपासात सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ खुळे व कदम यांच्या पथकास त्या भुसावळ येथे गुरुवारी सकाळी सापडल्या. नोकरीच्या शोधार्थ भुसावळ येथे गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.