वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, मारहाणप्रकरणी तिघांना तीन महिने सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:14 AM2021-03-01T04:14:05+5:302021-03-01T04:14:05+5:30

पुणे : वाहतूक पोलिसांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले असतानाही आरोपींनी गाडी थांबविली नाही. उलट वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ ...

Three months hard labor for abusing a traffic police officer | वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, मारहाणप्रकरणी तिघांना तीन महिने सक्तमजुरी

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, मारहाणप्रकरणी तिघांना तीन महिने सक्तमजुरी

Next

पुणे : वाहतूक पोलिसांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले असतानाही आरोपींनी गाडी थांबविली नाही. उलट वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ तसेच मारहाण केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने तीन महिने सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

प्रशांत भगवान पोकळे (वय ३०, रा. बरंगनी मळा, धायरी), रितेश सुरेश जाधव (वय ३०), राहुल अशोक कुचे (वय १९, दोघेही रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) अशी त्यांची नावे आहे. याप्रकरणात, पोलीस शिपाई सुरेंद्र साहेबराव साबळे (वय २६) यांनी फिर्याद दिली होती.

दि. १४ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात ही घटना घडली. फॅन्सी नंबर प्लेट असलेली चारचाकी घेऊन आरोपी कसबा पेठेतील कुंभारवेस चौक येथून गाडीतळच्या दिशेने निघाले होते. कुंभारवेस चौकात वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा देऊनही आरोपींनी गाडी थांबविली नाही. याबाबतची माहिती त्यांनी वायरलेसवरून दिली. त्यानंतर, शाहीर अमर शेख चौकात नियमन करणाऱ्या पोलिसांनी आरोपींची गाडी बाजूला घेतली. या कारणावरून आम्ही अतिरेकी आहोत का, चोर आहोत का अशी विचारणा करत आरोपींनी फिर्यादींना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात त्यांना अटक करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या वेळी सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी सहा साक्षीदार तपासले. यामध्ये, फिर्यादीसह ससून रुग्णालयाचे सीएमओ डॉ. तुषार तोंडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पोलीस साक्षीदार विश्वासार्ह साक्षीदार असून त्याची साक्ष ग्राह्य धरण्यात यावी, याबाबत सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे दाखले अ‍ॅड. क्षीरसागर यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना/भळगट यांच्या न्यायालयाला दिले. अंतिम युक्तिवादानंतर कायद्यामधील कलम ३५३ मध्ये दुरुस्ती झाल्याने संबंधित खटला निकालाकरिता सहायक सत्र न्यायाधीश अमित व्ही. खारकर यांच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला. या वेळी सरकारी वकील डी. एम. सोननीस यांनी बाजू मांडली.

Web Title: Three months hard labor for abusing a traffic police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.