आंबेगाव-शिरूरचे तीन अधिकारी आयएएस
By admin | Published: March 31, 2016 02:57 AM2016-03-31T02:57:22+5:302016-03-31T02:57:22+5:30
राज्यातील २९ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये (भाप्रसे) सामावून घेण्यात आले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तीनही अधिकारी
पुणे/ घोडेगाव : राज्यातील २९ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासनिक सेवेमध्ये (भाप्रसे) सामावून घेण्यात आले असून, त्यात पुणे जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तीनही अधिकारी आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील आहेत.
आयएसओ संकल्पना
राबविणारे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिरूर तालुक्यातील जातेगावचे कांतिलाल उमाप, नांदेडला डासमुक्त पॅटर्न राबविणारे मुख्य कार्यकारी व मूळचे आंबेगावमधील घोडेगावचे अभिमन्यू काळे व गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मूळचे आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील दिलीप गावडे या तिघांचा समावेश आहे.
२०१३ आणि २०१४ मध्ये
रिक्त झालेल्या पदांवर त्यांना
संधी मिळाली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील आहेत. सन १९८९ च्या बॅचचे असून, यातील काळे यांनी आपल्या कामाची सुरुवात प्रांताधिकारी म्हणून सांगली येथे, गावडे यांनी सातारा, तर उमाप यांनी कोल्हापूर येथे केली. उमाप यांच्यावर बुधवारी दिवसभर अभिनंदनाचा वर्षाव होत होता. (प्रतिनिधी)
कांतिलाल उमाप यांनी अनेक वर्षे मंत्रालयात काम केले. आरोग्य विभागात काम करताना राजीव गांधी जीवनदायी योजना व १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका या योजना सुरू करण्यात त्यांचे योगदान आहे. तसेच आयएसओ प्रमाणपत्रही पुणे जिल्ह्यात राबविलेली संकल्पना आता राज्यानेही स्वीकारली आहे.
दिलीप गावडे यांनी अनेक वर्षे मुंबईत काम केले, त्यांची ओळख एक अभ्यासू व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून आहे.
अभिमन्यू काळे यांनी नांदेड जिल्ह्यात डासमुक्तीसाठी शोषखड्डा उपक्रम राबवून एक पथदर्शी कार्यक्रम दिला. तसेच दापोली कृषी विद्यापीठ, म्हाडा येथे काम केले आहे.