जुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 09:57 PM2018-09-23T21:57:38+5:302018-09-23T21:58:01+5:30
जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ५ मुलापैकी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
Next
जुन्नर : जुन्नर तालुक्यातील कावळ पिंपरी येथील तळ्यात गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ५ मुलापैकी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.या दुर्घटनेत गणेश नारायण चक्कर ( वय-९),सुमित सावकार पाबळे ( वय-११ ),वैभव विलास पाबळे ( वय- ११) अशी बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे कावळ पिंपरी गावावर या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे.