होर्डिंगप्रकरणात तिघा जणांचा जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 02:49 AM2018-11-06T02:49:37+5:302018-11-06T02:49:49+5:30

शहीद अमर शेख चौकातील होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केलेल्या ठेकेदार आणि रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मुुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

 Three people granted bail in hoardings | होर्डिंगप्रकरणात तिघा जणांचा जामीन मंजूर

होर्डिंगप्रकरणात तिघा जणांचा जामीन मंजूर

Next

पुणे : शहीद अमर शेख चौकातील होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केलेल्या ठेकेदार आणि रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मुुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जुना बाजारजवळील शहीद अमर शेख चौकात ५ आॅक्टोबर रोजी होर्डिंग कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी रेल्वेचे अभियंते संजयसिंग विष्णुदेव आणि यांचे सहकारी पांडुरंग निवृत्ती वनारे; तसेच कॅप्शन अ‍ॅडव्हर्टायझिंग कंपनीचा मालक अब्दुल रज्जाक महम्मद खालीद फकिह यांना अटक केली होती. उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन अर्ज मंजूर केला आहे.

Web Title:  Three people granted bail in hoardings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.