तीन जणांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा

By admin | Published: May 29, 2016 03:44 AM2016-05-29T03:44:05+5:302016-05-29T03:44:05+5:30

डॉ. डी. वाय. पाटील फार्महाऊस थेऊरच्या व्यवस्थापकास जातीवाचक शब्द वापरून, शिवीगाळ करून, हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी थेऊर येथील तिघांवर अनुसूचित

Three people have been charged under the Atropic Law | तीन जणांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा

तीन जणांवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा

Next

लोणी काळभोर : डॉ. डी. वाय. पाटील फार्महाऊस थेऊरच्या व्यवस्थापकास जातीवाचक शब्द वापरून, शिवीगाळ करून, हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी थेऊर येथील तिघांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजित सुदाम काकडे, दत्तात्रय कुंडलिक काकडे व किरण रामभाऊ काकडे (तिघेही रा. ग्रामपंचायत कार्यालयासमोर, थेऊर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रकाश लहू कांबळे (वय ४९, रा. फ्लॅट क्रमांक ३४, सी विंग, तिसरा मजला, आकाशवाणी समोर, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.
हा प्रकार २७ मे रोजी दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. प्रकाश कांबळे हे नेहमीप्रमाणे फार्महाऊसवर काम करीत होते. त्या वेळी तिघेजण तेथे आले व त्यांनी सुरक्षारक्षकास कांबळे यांना बाहेर बोलावून आणण्यास सांगितले. निरोप मिळाल्यानंतर कांबळे उदय भालचंद्र पाटील यांच्यासमवेत बाहेर आले. त्यावेळी हे तिघे फार्महाऊस समोर उभे होते. त्या वेळी सुजित व दत्तात्रय काकडे म्हणाले की, पाटील व आमचा जमिनीचा वाद होता, त्याबाबतचा निकाल कोर्टाने आमच्या बाजूने दिला असून, फार्महाऊसमधील आमच्या जागेत सुरू असलेले बांधकाम थांबवा. कांबळे यांनी मालक बाहेर गेले असून, ते आल्यानंतर तुमची भेट घडवून आणतो, चर्चा करा व काय असेल ते पाहून घ्या, असे सांगितले. कांबळे यांनी असे सांगताच सुजित काकडे हा त्यांच्या अंगावर धावून गेला व हाताने कानामागे व तोंडावर मारले. दत्तात्रय काकडे याने जागा ताबडतोब खाली करा नाही, तर तुमच्याकडे पाहतो, अशी धमकी दिली. यानंतर सुजित याने जातीवाचक शब्द वापरले.

- मागील वेळेस काकडे व कांबळे यांच्या भांडणाच्या वेळी कांबळेकडे जसे बघितले तसे पाहतो व तू पोलिसांत तक्रार दिली, तर तू थेऊर फाट्यावर कसा येतोस हे पाहतो. तुझे हातपाय मोडतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. उदय पाटील यांनी मध्यस्ती करून हे भांडण मिटवले. याप्रकरणी कोणासही अटक केली नाही.

Web Title: Three people have been charged under the Atropic Law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.