गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांना बांबूने बेदम मारहाण, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 10:30 AM2023-09-05T10:30:32+5:302023-09-05T10:31:28+5:30

ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या आवारात सेवक वसाहतीमध्ये घडली...

Three people were brutally beaten with bamboo for not paying registration for Ganeshotsav, an incident in Pune | गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांना बांबूने बेदम मारहाण, पुण्यातील घटना

गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांना बांबूने बेदम मारहाण, पुण्यातील घटना

googlenewsNext

पुणे : गणेशोत्सवासाठी वर्गणी मागितली असता, ती देण्यास नकार देणाऱ्या एका तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या आवारात सेवक वसाहतीमध्ये घडली. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दिनेश वाल्मिकी (३०), प्रतीक मल्हारी (२३, दोघेही रा.विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (२५, रा.चिखलवाडी, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कृष्णा किशोर तांबोळी (३५) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कृष्णा तांबोळी आणि आरोपी वाल्मिकी, मल्हारी विद्यापीठाच्या आवारातील सेवक वसाहतीत राहायला आहेत. वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तांबोळी यांच्याकडे गणेशोत्सवासाठी वर्गणीची मागणी केली होती. त्यावेळी तांबोळी यांनी वर्गणी देण्यास नकार दिला. सेवक वसाहतीतील मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे तांबोळी यांनी सांगितले. या कारणावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी तांबोळींना बांबूने बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक रायकर करत आहेत.

Web Title: Three people were brutally beaten with bamboo for not paying registration for Ganeshotsav, an incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.