बेकायदेशीर गुंतवणूक व भिशीच्या नावाखाली ५०० हून अधिक जणांना गंडा; ३ जणांना अटक   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 06:16 PM2021-06-21T18:16:53+5:302021-06-21T18:21:34+5:30

उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक जणांकडून २०० कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुबियांसह उरुळी कांचन 'शेठ'ने येेेथून धूम ठोकली होती.

Three person were arrested in case of fraud of more than 200 crore with 500 people | बेकायदेशीर गुंतवणूक व भिशीच्या नावाखाली ५०० हून अधिक जणांना गंडा; ३ जणांना अटक   

बेकायदेशीर गुंतवणूक व भिशीच्या नावाखाली ५०० हून अधिक जणांना गंडा; ३ जणांना अटक   

googlenewsNext

उरुळी कांचन: बेकायदेशीर गुंतवणुकीच्या व भिशीच्या नावाखाली उरुळी कांचन,लोणी काळभोर, हडपसर सह परिसरातील पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणार्‍या आरोपींना गुजरात पोलिसांनी अखेर पाकिस्तानच्या सीमेवरुन रविवारी (ता. २०) अटक करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

भरतकुमार चरणदास जोशी आणि त्याची दोन मुले हिरेनकुमार जोशी व दीपककुमार जोशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसर सह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक बड्या आसामींकडून सुमारे दोनशे कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुबियांसह उरुळी कांचन  येेेथून ऑगस्ट २०२० ला भरतकुमार शेठने धूम ठोकली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबत उरुळी कांचन गावातील काही गुंतवणुकदारांनी पुढे येऊन सप्टेंबर २०२० ला शेठच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात लेखी स्वरुपात तक्रार दिली होती.

या व्यापाऱ्याकडे बडे व्यावसायिक मोठ्या रक्कमांची गुंतवणूक भिशीत करत असल्याने गुंतवणूक करत असल्यानेे आत्मविश्वास वाढला होता. या भिश्यांमध्ये गुंतवणूकदारांचा आकडा शेकडोपर्यंत पोहोचला होता. मात्र, या व्यापाऱ्याने भिशीत गुंतवणूक करणाऱ्या शेकडो गुंतवणूकदारांच्या हातावर तुरी देऊन गंडा घातला होता. पोलिसांनी त्याला पकडून देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते.                 

कसा झा

भिशीचे पैसे वेळेवर देण्यास टाळाटाळ सुरु केल्याने या शेठचा बाजार उठण्यास सुरुवात झाली. ऑगस्ट महिन्यात व्यापाऱ्याच्या पत्नीला कोरोना झाल्याने उरुळी कांचन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, व्यापारी रातोरात स्वतः नंतर परिवाराला घेऊन फरार झाला. दरम्यान, भिशी चालविणारा व्यापारी फरार झाल्याने भिशीत पैसै अडकणाऱ्या केवळ ५ जणांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र भिशी व्यतिरिक्त अन्य प्रकारे फसवणूक झाल्याचे सबळ कारण नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार नोंदली जात नसल्याने "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली होती.

ठकास महाठक भेटला
पुणे जिल्ह्यातील एका आर्थिक गैरव्यवहारात घसरून कुलुप लागलेल्या सहकारी बँकेत या व्यापाऱ्याच्या नावावर अडचणीत आलेल्या संस्था चालकाने कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याची चर्चा आहे.

Web Title: Three person were arrested in case of fraud of more than 200 crore with 500 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.