तीन पल्सर दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:41 PM2018-06-28T16:41:52+5:302018-06-28T21:25:19+5:30

तीनही दुचाकी पुणे शहर, जेजुरी आणि वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी करण्यात आल्या.

three persons arrested in case of pulsar motar cycles theft | तीन पल्सर दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना अटक  

तीन पल्सर दुचाकी चोरणाऱ्या आरोपींना अटक  

Next
ठळक मुद्देया तीनही दुचाकींची साडेचार लाख रुपये किमतीचे हॅण्डल लॉक तोडून चोरी

पुणे: मंगळवार पेठ येथे नंबर प्लेट नसलेल्या तीन पल्सर दुचाकी गाड्या घेऊन संशयितरित्या उभ्या असलेल्या तीन व्यक्ती पेलिसांना आढळून आल्या. त्यांच्याकडे या दुचाकींबाबत पोलिसांनी चौकशी गेली असता तीनही दुचाकी पुणे शहर, जेजुरी आणि वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. वाहनचोरी प्रकरणी ऋषीकेश संजय मुळीक (रा.अनपटवाडी , ता.कोरेगाव, जि. सातारा), शुभम सनिल बोडरे (रा. आदर्की , ता. फलटण, जि.सातारा) आणि सुमीत नाना भंडलकर (रा. राजापूर, ता. भोर, जि.पुणे)असे अटक करण्यात आली आहे.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मंगळवार पेठ येथे अटक करण्यात आलेले आरोपी पल्सर कंपनीच्या लाल, निळ्या रंगाच्या दुचाकी घेऊन उभे असलेले पोलिसांना आढळून आले. त्यासंबंधी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी वाहन चोरीची कबुली दिली. शहरात सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे.  
  ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे ,पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस उपायुक्त समिर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन भोसले, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम आणि दिनेश पाटील, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, मेहबूब मोकाशी , सुभाष पिंगळे , राजू पवार, प्रकाश लोखंडे, आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. 


 

Web Title: three persons arrested in case of pulsar motar cycles theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.