लाच प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:48+5:302021-06-03T04:09:48+5:30

पुणे : शहरातील वाहतूक शाखेचे लाच प्रकरणात कारवाई झालेले पोलीस उपनिरीक्षक बसवराज चिट्टे, डॉक्टरांना मारहाण करणारा गुन्हे शाखेचा पोलीस ...

Three policemen, including a police sub-inspector, have been suspended in a bribery case | लाच प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस निलंबित

लाच प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस निलंबित

Next

पुणे : शहरातील वाहतूक शाखेचे लाच प्रकरणात कारवाई झालेले पोलीस उपनिरीक्षक बसवराज चिट्टे, डॉक्टरांना मारहाण करणारा गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड आणि अवैध धंदेवाल्यासोबत संबंध असल्याचे निष्पन्न झालेला विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ बाळू खळसोडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

जाहिरात फलकासाठी एनओसी देण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून चिट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चिट्टे यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत. तसेच त्यांची खात्यातंर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बाणेर येथील कोविड सेंटरमधील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्र्या प्रकरणात सचिन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी गायकवाड याला निलंबित केले आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सोमनाथ खळसोडे यांनी पदाचे गैरवापर करत अवैध धंदेवाल्यांशी संबंध ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित केले आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

Web Title: Three policemen, including a police sub-inspector, have been suspended in a bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.