VIDEO: पुणे - सातारा महामार्गालगत तीन रानगव्यांचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 06:23 PM2021-12-08T18:23:04+5:302021-12-08T18:34:36+5:30

पुणे जिल्ह्यात वर्षानंतर पुन्हा रानगवे दिसल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते...!

three rangave gaur seen pune satara national highway | VIDEO: पुणे - सातारा महामार्गालगत तीन रानगव्यांचे दर्शन

VIDEO: पुणे - सातारा महामार्गालगत तीन रानगव्यांचे दर्शन

googlenewsNext

नसरापूर (पुणे): भोर तालुक्याच्या पूर्व भागातील सारोळा गावच्या - हद्दीत पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गाच्या जवळ असलेल्या रान झुडपात तीन रानगव्यांचे दर्शन नागरीकांना झाल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने भोर रेस्क्यू टीमच्या मदतीने रानगव्याच्या कुटुंबाला पुन्हा जंगलात सुखरूप सोडण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि बघ्यांची संख्या वाढल्याने मोहीममध्ये अडथळा येत असल्याने अखेर राजगड पोलिसांना पाचारण करावे लागले. 

पुणे-सातारा महामार्गाच्या महामार्गावर पुणे बाजूकडे जाणाऱ्या जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला असलेल्या मोकळ्या पटांगणात तीन रान गावे असल्याचे नागरिकांना पाहायला मिळाले. यामुळे काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

किकवी येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन रानगवे पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती आटोक्यात असल्याने रानगवे पकडण्यासाठी भोर आणि नसरापूर वनपरिक्षेत्रतील पथकाला पाचारण करण्यात केले होते. यावेळी महामार्गावरून बघ्यांची संख्या वाढल्याने भेदरलेले रानगवे रानाझुडपाच्या आड दबा घेऊन बसले होते. अखेर यशस्वी मोहीम राबवून वनविभागाने तिन्ही रानगव्यांना जंगलात सुखरूप सोडले आहे.

Web Title: three rangave gaur seen pune satara national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.