जेजुरीत तीनही रस्ते ब्लॉक

By admin | Published: April 13, 2015 06:16 AM2015-04-13T06:16:25+5:302015-04-13T06:16:25+5:30

तीर्थक्षेत्र जेजुरीत आज रविवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती. राज्यभरातून आलेल्या भाविकांची अचानक गर्दी उसळल्याने वाहतुकीचे नियोजन पुरते कोलमडले होते

Three road blocks in Jejuri | जेजुरीत तीनही रस्ते ब्लॉक

जेजुरीत तीनही रस्ते ब्लॉक

Next

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आज रविवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती. राज्यभरातून आलेल्या भाविकांची अचानक गर्दी उसळल्याने वाहतुकीचे नियोजन पुरते कोलमडले होते. जेजुरीत येणाऱ्या तीनही रस्त्यांवर वाहतुकीच्या रांगा लागल्या होत्या.
चैत्र महिन्यात शेतकरीवर्गातून कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेऊन कुलधर्म-कुळाचाराचे कार्यक्रम उरकण्याची लगबग सुरू असते. साधारणपणे चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या अमावास्येपर्यंतचे १५ दिवस जेजुरीतील चिंचबागेत आपापल्या कुटुंबकबिल्यासह, नातेवाइकांसह भाविक येत असतात. देव्हाऱ्यातील मूर्तींची देवभेट, कुलधर्म-कुळाचाराचे जागरण गोंधळाचे वा नवस फेडण्याचे कार्यक्रम येथेच उरकण्याची प्रथा असल्याने ऐतिहासिक चिंचबागेत, आनंदनगर परिसरात, लवथळेश्वर परिसरात भाविक उतरतात.
आज जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती. जेजुरीला यात्रेचे स्वरूप आले होते. यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी रहदारी होती. नीरा, मोरगाव आणि सासवड मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी १० वाजल्यापासून वाहनांना हे रस्तेही कमी पडत असल्याचे दृश्य होते.
जेजुरी पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. तरीही वाहनांची गर्दी प्रचंड असल्याने ते कोलमडले होते. जेजुरीतील दोन्हीही मुख्य चौकात वाहतुकीस अडथळे येत असल्याने वाहनांच्या दीड-दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
यातच आज जेजुरीचा बाजार दिवस असल्याने गर्दीत मोठीच भर पडलेली होती. यामुळे जेजुरी पोलिसांचीही मोठी धांदल उडाली होती. पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियंत्रण करीत होते, मात्र पोलीसही हतबल झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Three road blocks in Jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.