दरोडा टाकणाऱ्या तिघांना नाशिकमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:53+5:302021-03-23T04:10:53+5:30
रणजितकुमार रामसेवक दास (वय 32, रा. बथनाह, ता. कुनौली, जि. सुपौल, बिहार), सुशील रामअवतार कामत (वय 36, रा. कुनौली ...
रणजितकुमार रामसेवक दास (वय 32, रा. बथनाह, ता. कुनौली, जि. सुपौल, बिहार), सुशील रामअवतार कामत (वय 36, रा. कुनौली बजार, ता. कुनौली, जि. सुपौल, बिहार), शैलेंद्रकुमार शिवलखन मंडल (वय 32, रा. कोईलाडी तैलाठी, हनुमान नगर, जि. सप्तरी, नेपाळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.रवी सुभाष चंदनशिवे (वय 47, रा. वाघोली) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंदनशिवे हे ट्रक चालक आहेत. बुधवारी रात्री पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास दरोडेखोर आले. त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून ट्रकची चावी घेतली. फिर्यादी यांच्या अंगावर चादर टाकून त्यांना दाबून ठेवले.ट्रक चालू करून तो म्हाळुंगेपर्यंत चालवत नेला. त्यानंतर आरोपींनी गाडीतील 19 लाख 99 हजार 405 रुपये किमतीचे सब असेम्ब्ली मोटार युनिटस्टार्टर (ऑटोमोबाईल पार्ट) दुस-या गाडीत काढून घेतले.याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर म्हाळुंगे पोलिसांनी दोन पथके तयार केली. दरम्यान, हे दरोडेखोर नाशिकमार्गे बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार म्हाळुंगे पोलिसांनी नाशिकला धाव घेतली. नाशिक पोलीस, नाशिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने 12 तास रेल्वे स्थानकावर सापळा लावण्यात आला.पोलिसांची नजर चुकवून आरोपी रेल्वेत बसण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यात तिघेजण पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींकडून 19 लाख 99 हजार 405 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे हे करीत आहे.