तीन सोनसाखळ्या हिसकावल्या
By admin | Published: April 27, 2015 04:55 AM2015-04-27T04:55:29+5:302015-04-27T04:55:29+5:30
भोसरी, पिंपरी आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.
पिंपरी : भोसरी, पिंपरी आणि हिंजवडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शनिवारी एकाच दिवशी सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.
पिंपरी गावातील तपोवन रोडवरून पायी जात असलेल्या ६० वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकाविली. हा प्रकार शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडला. तर, दापोडीतील शितळादेवी चौकात २९ वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकाविली. ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधन बुदु्रकमधील तलाठी कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सोनसाखळी चोरीची घटना घडली. यामध्ये चोरट्याने ४२ वर्षीय पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली.
मजूर महिलेचा मृत्यू
डोक्यावर लाकडी फळी पडल्याने सविता उमेश वर्मा (वय ३५) या महिला मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी मोशी येथे घडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी दिलेली माहिती अशी : सविता या मोशी येथील एका बांधकाम साइटवर काम करतात. शनिवारी दुपारी काम करीत असताना, एक लाकडी फळी त्यांच्या डोक्यात पडली. हेल्मेटला चीर पडून डोक्याला गंभीर मार लागला. या घटनेत सविताचा
मृत्यू झाला. (प्रतिनिधी)