निवडणूक बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस तैनात

By admin | Published: February 20, 2017 02:57 AM2017-02-20T02:57:27+5:302017-02-20T02:57:27+5:30

ऐन निवडणूक काळात ज्या भागात गुन्हेगारी घटना घडल्या. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या भागात संवेदनशील प्रभाग घोषित केले होते

Three thousand police deployed for the election | निवडणूक बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस तैनात

निवडणूक बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस तैनात

Next

पिंपरी : ऐन निवडणूक काळात ज्या भागात गुन्हेगारी घटना घडल्या. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या भागात संवेदनशील प्रभाग घोषित केले होते, अशा ठिकाणी, झोपडपट्टीनजीकच्या मतदान केंद्रावरील भोसरी, चिंचवड, निगडी, पिंपरी भागातील ६३ बूथवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. बंदोबस्तासाठी तीन हजार पोलीस कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, २४ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तीन हजार कर्मचारी अशी फौज तैनात आहे. त्याचबरोबर राज्य राखीव दलाच्या पोलिसांची जादा कुमक मागवली आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. निवडणूक शांततेत पार पडावी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, १६५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २ हजार ४५१ पोलीस कर्मचारी, बूथसाठी १ हजार ६०८ कर्मचारी, १०० मीटरसाठी वेगळे ४६५, मतदान केंद्रातील पाचपेक्षा अधिक बूथवर ५०, सेक्टर पेट्रोलिंगसाठी १३५, वेगवेगळ्या पेट्रोलिंगसाठी १२५ कर्मचारी तैनात असतील. राज्य राखीव दलाचे २०० पोलीस शहरात  दाखल झाले आहेत. संवेदनशील बूथवर एक अधिकारी तैनात असणार आहे.(प्रतिनिधी)

इलेक्शन वॉचसाठी ६०० कॅमेरे

 शहरात ६०० कॅमेरे आहेत. त्याचा वापर करणार आहोत. पुण्यातील मध्यवर्ती देखरेख कक्षाचीही मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात राज्य राखीव दलाचे पोलीस तैनात असणार आहेत. सोमवारी पोलीस कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर निवडणूक निर्णय कार्यालय येथे जातील, असे नियोजन आहे.

Web Title: Three thousand police deployed for the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.