एका फ्लॅटची तीनवेळा विक्री-बिल्डरवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:47+5:302021-08-18T04:16:47+5:30

माधवबाग, मांजरी बुद्रुक, गोपाळपटटी, (ता. हवेली) येथील श्री अपार्टमेंट बांधकाम साईटवरील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०६ (६२६ चौरस फूट) ...

Three-time sale of a flat filed against the builder | एका फ्लॅटची तीनवेळा विक्री-बिल्डरवर गुन्हा दाखल

एका फ्लॅटची तीनवेळा विक्री-बिल्डरवर गुन्हा दाखल

Next

माधवबाग, मांजरी बुद्रुक, गोपाळपटटी, (ता. हवेली) येथील श्री अपार्टमेंट बांधकाम साईटवरील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०६ (६२६ चौरस फूट) व फ्लॅट क्र.२०७ (७०२ चौरस फूट) या दोन सदनिका बांधकाम व्यावसायिक सचिन दत्तात्रय वटारे (रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी) यांनी रविकिरण बाबासाहेब चव्हाण (रा. साडेसतरानळी, हडपसर, पुणे) यांना २०१५ मध्ये सहदुय्यम निबंधक, हवेली क्र.३, मगरपट्टा, हडपसर यांचेकडे खरेदी दस्त नोंदवून त्याची विक्री केली. त्यासाठी ॲडव्हान्स रक्कम ४ लाख २ हजार ५१० रुपये रोख स्वरूपात तर फायनान्सतर्फे २७ लाख ४७ हजार ४९० रुपये असे एकूण ३१ लाख ५० हजार रुपये तसेच ८ लाख ५० हजार रुपयांचे धनादेश घेतले होते. चव्हाण हे बांधकाम झाल्यानंतर साइटवर गेले असता तेथे त्यांनी खरेदी केलेल्या दोन्ही फ्लॅटमध्ये अनोळखी व्यक्ती राहत असल्याचे दिसले. चव्हाण यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा फ्लॅट हे बिल्डरकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला. चौकशीमध्ये बिल्डर सचिन वटारे याने फ्लॅट क्रमांक २०७ हा सप्टेंबर २०१५ मध्ये नोटरी करारनामा करुन हिरावती पाल व राममुरत पाल यांना विक्री करून त्यांना राहण्यासाठी प्लॅट क्रमांक २०६ चा ताबा दिला व फ्लॅट क्रमांक २०७ हा सुरेखा सोपान चौधरी यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये सह दुय्यम निबंधक, हवेली क्रमांक १८ काळेवाडी, पिंपरी यांच्याकडे दस्त नोंदवून यापूर्वी विक्री केलेला असतानाही बेकायदेशीररित्या दोन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केल्याचे उघड झाले.

वटारे यांनी रविकिरण चव्हाण यांना मांजरी बुद्रुक हडपसर येथील दोन फ्लॅटचे पैसे घेऊन खरेदी खत करून दिलेले असतानाही बिल्डिंग बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चव्हाण यांना ताबा न देता या फ्लॅटची बेकायदेशीरपणे परस्पर आणखी दोघांना नोटरी करारनामा व खरेदी खताने विक्री करुन त्याचा ताबा फिर्यादी यांना न देता चव्हाण यांची एकूण ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. चव्हाण यांनी बिल्डरकडे वेळोवेळी प्लॅटचा ताबा मागूनही तो न दिल्याने दिलेले पैसे परत मागितले असता उडवाउडवीची उत्तरे देवून बिल्डरने टाळाटाळ केली. म्हणून त्याबाबत चव्हाण यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three-time sale of a flat filed against the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.