अपघातात तीन परप्रांतीय ठार
By admin | Published: June 22, 2017 07:18 AM2017-06-22T07:18:07+5:302017-06-22T07:18:07+5:30
येथील वाडा गाव फाट्यावर दुचाकीवर चाललेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : येथील वाडा गाव फाट्यावर दुचाकीवर चाललेल्या तिघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघे जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीच्या नंबरवरून मृतांची ओळख पटली आहे.
अपघातातील मृतांची नावे संजय अमल पारुई (वय १६, रा.
जम्बेरिया अबाद, नॉर्थ २४, परगनास, मुरानिशा, पश्चिम बंगाल), निर्मळ आशिन मंडल (वय २१, रा.
आदसिंग्री (अंगशा) अससिंग्री, बोनगाव, नॉर्थ २४ परगनास, पश्चिम बंगाल), लालटू आनंद दाट (रा. सदर) अशी आहेत.
कोरेगाव भीमा येथील वाडा गाव फाट्याजवळ काल रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नगर बाजूकडे (एमएच १२ सीएल ०७५९) या दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला मार लागला होता. त्यात दोघे जण जागेवरच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रामदास गव्हाणे यांनी एका जखमीला खासगी रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान तिसऱ्या दुचाकीस्वाराचाही मृत्यू झाला आहे. ही दुचाकी रघुनाथ गजाबा चौंधे (रा. पेरणेफाटा, ता. हवेली) यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुचाकीचे मालक चौंधे यांनी त्यांची दुचाकी तिघा मित्रांना दिल्याचे सांगितले. त्यावरून ओळख पटली.