निवृत्त सुभेदाराला तीन वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: May 5, 2017 02:57 AM2017-05-05T02:57:02+5:302017-05-05T02:57:02+5:30
जमीनीच्या वादातून एकावर डबलबोअर बंदुकीतून गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरूमीतसिंग बंतासींग मिनहास (वय ८७, रा. वाघोली ता. हवेली ) या
पुणे : जमीनीच्या वादातून एकावर डबलबोअर बंदुकीतून गोळी झाडून ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरूमीतसिंग बंतासींग मिनहास (वय ८७, रा. वाघोली ता. हवेली ) या सेवानिवृत्त सुभेदाराला तीन वर्ष सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.जी. गिमेकर यांनी सुनावली.
राजेश गुलाबराव गायकवाड (वय ४३, रा. दौंड) यांनी यासंदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २८ आॅक्टोबर २०१३ रोजी वाघोली परिसरात ही घटना घडली. राजेश गायकवाड यांच्या आई संपदाबाई गायकवाड आणि बहीण रेखा प्रमोद काटे यांनी वाघोली परिसरात जागा घेतली होती. राजेश गायकवाड यांच्या लहान भाऊ अनिल याने ती जागा बळकावून तेथे अतिक्रमण केले.त्या वादातून रेखा काटे यांनी यासंदर्भात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
याप्रकरणी सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी सहा साक्षीदार तपासले. फिर्यादी, त्यांची पत्नी लक्ष्मी, बॅलेस्टिक एक्सपर्ट यांचा पुरावा महत्वाचा ठरला. लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.व्ही. खानापुरे यांनी तपास केला. पोलीस नाईक संजय जाधव यांनी खटल्यात मदत केली. (प्रतिनिधी)

अनिल गायकवाड आणि त्याचा मित्र गुरमितसिंह मिनहास यांना हा दावा दाखल करण्यासाठी राजेश गायकवाड यांनी बहिणीला मदत केल्याचा संशय होता. मिनहास यांनी गायकवाड घरी बोलावले. घरी येत असताना मिनहास यांनी बहिणीला केस मागे घेण्यास सांग, तिला मदत करू नकोस असे म्हणून त्याच्या बंदुकीतून गायकवाड यांच्या दिशेने गोळी झाडली.