तीन वर्षांपासून सुरू असलेली एसटीतील वायफाय सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:54 PM2019-05-27T13:54:16+5:302019-05-27T14:09:40+5:30

‘एसटी’ने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षांपुर्वी बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली...

Three years started Wi-Fi service is closed | तीन वर्षांपासून सुरू असलेली एसटीतील वायफाय सेवा बंद

तीन वर्षांपासून सुरू असलेली एसटीतील वायफाय सेवा बंद

Next
ठळक मुद्देप्रवाशांना मोबाईलवर ही सुविधा मिळाल्याने प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी त्याचा वापर लांबपल्ल्याचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, हा त्यामागचा उद्देशवायफायद्वारे केवळ काही ठराविक चित्रपट, नाटके, गाणी बघण्यासाठी उपलब्धस्वारगेट व शिवाजीनगर एसटी आगारातील ५० बसमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये ही सुविधा प्रतिसादाअभावी आता संस्थेकडून ही सुविधा बंद

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)च्या बसमध्ये मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली वायफाय सुविधा बंद करण्यात आली आहे. वातानुकूलित बससह साधारण बसमध्येही प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध असलेली ही सुविधा प्रतिसादाअभावी बंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  
एसटी’ने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली. लांबपल्ल्याचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, हा त्यामागचा उद्देश होता. प्रवाशांना मोबाईलवर ही सुविधा मिळाल्याने प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी त्याचा वापर होत होता. या सुविधेला अनेक मार्गांवर चांगला प्रतिसादही मिळाला. तसेच अनेकदा या सुविधेमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे अनेक बसमधील ही सुविधा बंद पडली होती. पण वायफायद्वारे केवळ काही ठराविक चित्रपट, नाटके, गाणी बघण्यासाठी उपलब्ध होती. त्यामुळे नंतर या सुविधेचा प्रतिसादही कमी होत गेला. 
‘एसटी’ला एका खासगी संस्थेकडून ही सुविधा मोफत देण्यात आली होती. त्याची देखभाल-दुरूस्तीही संस्थेकडूनच केली जात होती. आता प्रतिसादच कमी झाल्याने संस्थेकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे विभागात स्वारगेट व शिवाजीनगर एसटी आगारातील ५० बसमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये ही सुविधा दिली होती. टप्प्याटप्याने ३२५ बसपर्यंत ही सुविधा वाढविण्यात आली. त्यानंतर सर्वबसमध्ये ही सुविधा देण्यात आली. या बसच्या सुमारे १९ हजार फेऱ्या होतात. प्रतिसादाअभावी आता संस्थेकडून ही सुविधा बंद करण्यात आल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले.
------------
खासगी कंपनीकडून एसटीला वायफायची सुविधा मोफत देण्यात आली आहे. त्याची संपुर्ण देखभाल दुरूस्ती संस्थेकडेच असते. सध्या अनेक बसमधील वायफाय बंद आहे. मात्र, ही सुविधा संस्थेकडूनच बंद केल्याचे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
- यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभाग 

Web Title: Three years started Wi-Fi service is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.