तीन युवकांनी केले निराधार महिलेचे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:05+5:302021-05-19T04:10:05+5:30
हिराबाई निवृत्ती साळवे (वय-६२, रा. रमामातानगर माळेगाव) ही पती व मुलेबाळे नसलेली निराधार महिला पडेल ते काम करून ...
हिराबाई निवृत्ती साळवे (वय-६२, रा. रमामातानगर माळेगाव) ही पती व मुलेबाळे नसलेली निराधार महिला पडेल ते काम करून आपली उपजीविका करत होती. कोरोनाची लागण हिराबाईला देखील झाली होती. युवाशक्ती दहीहंडी संघाचे संस्थापक विशाल घोडके व अमोल भोसले यांनी तिला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
अखेर कोरोनाने हिराबाईला हरविले. काल (दि.१७) हिराबाईचे निधन झाले. अंत्यविधी कुणी करायचा असा प्रश्न दवाखान्याच्या प्रशासनाला पडला. दवाखाना प्रशासनाने विशाल घोडके यास फोन करून अडचण सांगितली. अखेर विशाल घोडके,अमोल भोसले,प्रविण जगताप या तीन युवकांनी हिराबाईवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
कोरोनामुळे सख्खी माणसं परकी झाली आहेत. निराधार हिराबाई आपलीच मानून अंत्यसंस्कार केले.यापुढे ज्यांना कोणी नसेल अशांचे देखील अंत्यसंस्कार केले जातील. शेवटी माणुसकी महत्त्वाची आहे.
- विशाल घोडके
संस्थापक युवाशक्ती दहीहंडी संघ