भीमा नदीवरील बंधाऱ्याचा ढापा निखळला, हजारो लिटर पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:22 AM2018-11-10T00:22:54+5:302018-11-10T00:24:07+5:30

खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच बंधा-याला बसवण्यात आलेले लोखंडी ढापे कमकुवत असल्यामुळे पाण्याचा दाब वाढून एक ढापा निखळला आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

Threshold of Bhima on Bhima was reduced, Thousands of liters of water leakage | भीमा नदीवरील बंधाऱ्याचा ढापा निखळला, हजारो लिटर पाण्याची गळती

भीमा नदीवरील बंधाऱ्याचा ढापा निखळला, हजारो लिटर पाण्याची गळती

Next

दावडी -  खरपुडी (ता. खेड) येथील भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर बंधा-याचा एक ढापा निखळल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने काल (दि. ८) बातमी छापली होती. चासकमान धरणातून चार दिवसांपूर्वी भीमा नदीपात्रावरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे भरण्यासाठी पाणी सोडले होते. खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तसेच बंधा-याला बसवण्यात आलेले लोखंडी ढापे कमकुवत असल्यामुळे पाण्याचा दाब वाढून एक ढापा निखळला आहे. त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.
शुक्रवारी चासकमान धरणातून नदीपात्रात सोडलेले पाणी दुपारी बंद करण्यात आले. प्रशासनाने तातडीने याची दखल घेत खरपुडी बंधाºयाच्या तुटलेल्या ढाप्याची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्थानिक शेतकºयांच्या मदतीने या तुटलेल्या ढाप्याची दुरुस्ती करण्यासाठी सरसावले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा प्रयत्न असफल ठरला. पाटबंधारे कर्मचारी व शेतकरी यांनी झाडाचा पाला तोडून पोत्यामध्ये भरून ही पोती तुटलेल्या ढाप्याजवळ टाकली. मात्र, पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे त्यांनाही पाण्याने ओढून नेले.
गेल्यावर्षी पाटबंधारे विभागाने या बंधाºयाला शंभर नवीन व जुने लोखंडी ढापे मिळून बसवण्यात आले होते. यंदा या पाटबंधारे विभागाला माहिती असूनही हलगर्जीपणामुळे पुन्हा तेच जीर्ण झालेले लोखंडी ढापे बसविण्यात आले. ढाप्यांची दुरुस्ती न केल्यास दोन दिवसांत हा बंधारा रिकामा होईल अशी शक्यता निवृत्ती गाडे, बाळासाहेब मांजरे, अशोक मांजरे, मनोहर मांजरे, संतोष मांजरे व लखन मांजरे यांनी व्यक्त केली.

सायंकाळी पाणी केले बंद

भीमा नदीपात्रावरील केदारेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, खरपुडी, वाटेकरवाडी व निमगाव येथील बंधारे चासकमान धरणातून पाणी सोडल्यामुळे तुडुंब भरून शेल-पिंपळगाव येथील धरणात पाणी पोहोचले आहे. त्यामुळे आज (दि. ९) संध्याकाळी चासकमान धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात येणार आहे.
या परिसरात कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या आहेत. मागील वर्षी चासकमान धरणामध्ये डिसेंबर महिन्याअखेर १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
यंदा मात्र कमी पावसामुळे धरणात सध्या ७९.७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात चासकमान धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यास पाण्याचे आवर्तन सुरू आहे. अजून सहा महिने उन्हाळ्याचे दिवस बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे. अशी जर पाण्याची नासाडी होत असेल तर पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

खरपुडी येथील बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. मात्र कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळे चांगल्या पद्धतीचे लोखंडी ढापे बंधाºयाच्या तळाशी लावणे गरजेचे होते. तसेच कमकुवत ढापे बसविल्यामुळे पाण्याचा दाब येऊन एक ढापा निखळला आहे. या ढाप्याची आजच दुरुस्ती करून गळती थांबविण्यात येणार आहे.
- उत्तम राऊत, उपअभियंता,
चासकमान पाटबंधारे
विभाग खेड
 

Web Title: Threshold of Bhima on Bhima was reduced, Thousands of liters of water leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.