पुन्हा जिवंत झाला 26/11चा थरार
By admin | Published: November 26, 2014 12:11 AM2014-11-26T00:11:54+5:302014-11-26T00:11:54+5:30
पोलिसांनी कसाबला फासावर लटकावण्यार्पयतचा लढलेला यशस्वी लढा.. अशा एकाहून एक आठवणींचा थरार उपस्थितांनी पुन्हा एकदा प्रत्यक्षात अनुभवला.
Next
पुणो : मुंबईत झालेला 26/11चा दहशतवादी हल्ला. अजमल कसाब याचा समोर आलेला ‘क्रूर’ चेहरा.. मुंबई पोलिसांनी जगातील पहिल्या अतिरेक्याला जिवंत पकडण्याचे केलेले धाडस.. रागावर नियंत्रण ठेवून कर्तव्याची पराकाष्ठा करीत पोलिसांनी कसाबला फासावर लटकावण्यार्पयतचा लढलेला यशस्वी लढा.. अशा एकाहून एक आठवणींचा थरार उपस्थितांनी पुन्हा एकदा प्रत्यक्षात अनुभवला.
या हल्ल्यातील मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या माध्यमातून. या आरोपीमागे लागलेल्या तपास यंत्रणोचा संपूर्ण इतिवृत्तांत त्यांनी कथन केला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
ब्रिटिश पत्रकार अँब्यिन लेव्ही आणि कँथो स्कॉट क्लाई यांच्या ‘द सीज’ या अमित गोळवलकर यांनी अनुवादित केलेल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि रमेश महाले यांच्या हस्ते झाले.
बुधवारी 26/11च्या घटनेला 6 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने या आठवणींचा पट महाले यांनी उपस्थितांसमोर उलगडला. या प्रसंगी आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी उपस्थित होते.
महाले म्हणाले, ‘‘या केसमध्ये 96 अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र काम केले; त्यामुळेच 11 हजार 35क् पानांचा संच न्यायालयात सादर करू शकलो. न्यायालयात न पाठविलेल्या पानांची संख्या ही 5 हजार होती. केवळ 98 दिवसांत आम्ही हे काम केले. कसाब हा साधा माणूस नव्हता, लष्करे-तय्यबाने प्रशिक्षणातून 1क् चांगल्या प्रशिक्षणार्थीची या हल्ल्यासाठी निवड केली होती. अतिरेक्यांनी जे पाच जीपीएस यासाठी वापरले त्याचे केंद्र कराची होते. पाकिस्तानाच्या अंतर्गत भागात तो वापरला गेला. हे सिद्ध झाल्यामुळे पाकिस्तानने पहिल्यांदा हे आपले बाळ असल्याचे मान्य केले. दहशतवाद्याला पकडणो हे खरे तर मुंबई पोलिसांचे काम नव्हते; मात्र तरीही पोलिसांनी प्राणांची बाजी लावली. (प्रतिनिधी)
कसाब वॉर क्रिमिनल
4अविनाश धर्माधिकारी यांनी कसाबचा उल्लेख ‘वॉर क्रिमिनल’ असा केला. दोन देशांतील सीमा शस्त्रनिशी ओलांडणो, हा युद्धाचाच प्रकार असतो. त्यामुळे त्याला न्यायालयात उभे करणो ही एक धोरणातील चूक आहे. त्याला ‘वॉर क्रिमिनल’ म्हणूनच घोषित करायला हवे होते, असे सांगून ते म्हणाले, ‘‘इस्लामिक दहशतवाद हे जागतिक आव्हान आहे. ते तात्त्विकतेने सोडविणो अपेक्षित आहे. भारत हा संविधानिक, धर्मनिरपेक्ष देश आहे. हा प्रश्न आपला देश निश्चितचं सोडवू शकेल.’’