मुळशीत याद्यांचा घोळ
By Admin | Published: February 22, 2017 02:25 AM2017-02-22T02:25:55+5:302017-02-22T02:25:55+5:30
सकाळी ७.३० वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावायला सुरुवात केली होती.पण प्रशासनाकडून पुरविण्यात
पौड : सकाळी ७.३० वाजल्यापासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावायला सुरुवात केली होती.पण प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या घोळामुळे बहुतेक मतदार केंद्रांवर बी. एल. ओ., निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार प्रतिनिधीसह मतदार गोंधळले होते.
केंद्र प्रमुख व बी. एल. ओ. या दोघांकडील याद्या मधील मतदार क्रमांकात तफावत असल्याने मतदारांना आपला मतदान कक्ष व आपला मतदान क्रमांक शोधण्यात खूप वेळ जात होता. दुपारी ४ नंतर ऊन कमी झाल्यानंतर मतदार घराबाहेर पडू लागले़ त्यामुळे पिरंगुट, पौड, घोटावडे, माण, हिंजवडी, भूगाव या मोठ्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झालेली पहायला मिळत होती. माण मतदान केंद्रावर यंत्रात बिघात झाल्याने झाल्याने गोंधळ झाला. माणचे मतदान ६.४५ वाजता संपले तर जांभे येथे रात्री ८ वाजवपर्यंत मतदान सुरु होते. पिरंगुट गणातील सर्वाधिक मतदान पिरंगुट गावातच असल्याने या गणातील सारे उमेदवार दुपारपासून पिरंगुट मतदान केंद्रासमोर ठिय्या मांडून बसले होते.