बारामतीत भर रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार; वाहतुकीवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 22:49 IST2024-08-19T22:46:39+5:302024-08-19T22:49:15+5:30
आगीच्या या घटनेचा शहरातील भिगवण रस्त्यावरिल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र होते.

बारामतीत भर रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार; वाहतुकीवर परिणाम
बारामती - बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर एका कार ने अचानक पेट घेतल्याचचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि २०)सायंकाळी घडला.हि घटना पाहण्यास बघ्यांची गर्दी झाली होती.तसेच काही कळ वाहतूक देखील खोळंबल्याचे चित्र होते. कारच्या वायरींगमधील दोषामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहॆ. आगीच्या या घटनेचा शहरातील भिगवण रस्त्यावरिल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र होते.
शहरातील रिंगरोडकडे जाणाऱ्या चौकात मार्गस्थ होताना कारला आग लागली.अचानक हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली. ही कार जिथे थांबवली होती, त्या ठिकाणी कपड्यांचं शोरुम तर बाजूलाच हॉटेलही आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलिस यंत्रणा बोलवण्यात आली. अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान,आग लागल्याच्या वेळी कार मध्ये असणारा चालक तसेच इतर कोणी कार मधून प्रवासी प्रवास करीत होते का ,याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाहि.तसेच रात्री उशिरापर्यंत पोलिसांत याप्रकरणी कोणतीही नोंद नव्हती.