कोरोना आपत्तीशी लढताना पुणे शहरातील वर्षभराच्या घडामोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:35+5:302021-03-09T04:13:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशात कोरोना आपत्तीचा शिरकाव झाल्यावर खबरदारी म्हणून पुणे महापालिकेने लागलीच हालचाली सुरू केल्या़ ...

Throughout the year in the city of Pune fighting the Corona disaster | कोरोना आपत्तीशी लढताना पुणे शहरातील वर्षभराच्या घडामोडी

कोरोना आपत्तीशी लढताना पुणे शहरातील वर्षभराच्या घडामोडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : देशात कोरोना आपत्तीचा शिरकाव झाल्यावर खबरदारी म्हणून पुणे महापालिकेने लागलीच हालचाली सुरू केल्या़ दुर्देवाने राज्यातील पहिला कोरोनाबाधित रूग्ण पुण्यात ९ मार्च,२०२० रोजी पुण्यातच सापडला आणि काही दिवसातच पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले़ गेल्या वर्षभरात पुणे शहरात कोरोना आपत्तीशी लढताना ज्या यंत्रणा उभारण्यात आल्या त्याचा थोडक्यात आढावा...

* नायडू संसर्गजन्य रूग्णालयात फेब्रुवारी २०२० च्या दुसऱ्या आठवड्यापासून परदेशातून पुण्यात आलेल्या प्रवाशांची ‘आरटीपीसीआर’ तपासणी सुरू़

* फेब्रुवारी २०२० महिन्याच्या अखेरीस १० खाटांचा स्वतंत्र कोविड वॉर्ड तयार

* ९ मार्च रोजी पहिला रूग्ण आढळून आला़

* नायडू येथे ९ मार्चपासून १०० बेडचा (खाटांचे) कोविड वॉर्ड तयार

* २० मार्चपासून शहराच्या विविध भागात क्वारंटाईन सेंटरची उभारणी : सणस मैदान येथे पहिले सेंटर सुरू

* एप्रिल महिन्यात २५ कोविड केअर सेंटर व १७ क्वारंटाईन सेंटर सुरू

* आॅक्टोबरपर्यंत शहरात विविध ३५ ठिकाणी महापालिकेकडून तपासणी केंद्र उभारणी

* दहा खाजगी रूग्णांलयांबरोबर सांमजस्य करार करून कोरोनाबाधितांना उपचार सुविधा

* नायडू, बोपोडी, लायगुडे व दळवी रूग्णालयात मोफत आॅक्सिजन बेड व आयसीयु सुविधा

* २५ आॅगस्ट,२० पासून जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू, ३ सप्टेंबरपासून महापालिकेच्या ताब्यात : ६०० बेड सुविधा टप्प्या टप्प्याने सुरू : एकूण २२०० रूग्ण दाखल, २१० मृत्यू

* बाणेर येथे महापालिकेचे स्वतंत्र ३१४ बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू : आजही कार्यरत़

* नोंव्हेंबर, २० अखेर कोविड सेंटर व क्वारंटाईन सेंटरमधून ४६ हजार कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन परतले़

* सप्टेंबर, २०२० पर्यंत शहरात दोनशेपर्यंत पोहचलेली प्रतिबंधित क्षेत्रे डिसेंबरमध्ये शून्यवर आली होती़ मात्र आज पुन्हा हडपसर, मुंढवा, बिबवेवाडी, धनकवडी, नगररोड, कोथरूड, औंध येथे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे करण्याची वेळ आली आहे़

-----------------------------

Web Title: Throughout the year in the city of Pune fighting the Corona disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.