बर्फ टाकून द्या, ऑर्डर देण्याच्या आधी करा विचार; ‘अखाद्य’ बर्फाचा सर्रास वापर, पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 09:40 IST2025-03-22T09:38:55+5:302025-03-22T09:40:05+5:30

औद्योगिक वापरासाठी तयार होणारा कुलिंग बर्फ हा खाण्यासाठीच्या बर्फापेक्षा स्वस्त असल्याने विक्रेते त्याचा सर्रास वापर करतात

Throw away the ice think before ordering Widespread use of inedible ice playing with the health of Punekars | बर्फ टाकून द्या, ऑर्डर देण्याच्या आधी करा विचार; ‘अखाद्य’ बर्फाचा सर्रास वापर, पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ

बर्फ टाकून द्या, ऑर्डर देण्याच्या आधी करा विचार; ‘अखाद्य’ बर्फाचा सर्रास वापर, पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ

पुणे : शहरातील उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमान ४० अंशांच्या घरात पोहोचले आहे. या उष्णतेपासून थंडावा मिळवण्यासाठी नागरिक रसवंतीगृह, ज्यूस सेंटर आणि लिंबू शरबतांच्या टपऱ्यांकडे आकर्षित होत आहेत. मात्र, गारवा देणारे हे पेय खरेच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण, शहरातील अनेक ठिकाणी पेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ खाण्यायोग्य नसून ते दूषित पाण्यापासून तयार केल्यामुळे नवीन आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शीत पेयांमध्ये बर्फ टाकून द्या... अशी ऑर्डर देण्याच्या आधी विचार करा.

शहरातील अनेक रसवंतीगृहांचे विक्रेते आणि हातगाडीधारकांना खाण्यायोग्य आणि अखाद्य बर्फाचा फरकच माहीत नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. औद्योगिक वापरासाठी तयार होणारा कुलिंग बर्फ हा स्वस्त आणि सहज उपलब्ध असल्याने त्याचा सर्रास वापर होत आहे. मात्र, हा बर्फ दूषित पाण्यातून तयार झालेला असतो आणि त्यात अमोनिया तसेच घातक रसायने असतात. त्यामुळे पोटाचे विकार, घसादुखी, जुलाब, इन्फेक्शनसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात अनेक रसवंतीगृह विक्रेत्यांना खाण्यायोग्य आणि अखाद्य बर्फातील फरक समजत नाही .'एफडीए'ने बर्फ निर्मिती केंद्रांची नियमित तपासणी आणि दूषित बर्फाच्या विक्रीवर निर्बंध लावणे आवश्यक आहे.

स्वस्त बर्फ, महागात पडणारे आरोग्य!

औद्योगिक वापरासाठी तयार होणारा कुलिंग बर्फ हा खाण्यासाठीच्या बर्फापेक्षा स्वस्त असल्याने विक्रेते त्याचा सर्रास वापर करतात. अनेक कारखान्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि अन्न व औषध प्रशासनाचे परवाने आहेत, परंतु तरीही हा बर्फ दूषित आणि घातक पद्धतीने तयार होतो.

बर्फ नको आईसक्यूब हवा!

बर्फांची निर्मिती दोन प्रकारे होते एक आईसक्यूब बर्फ आणि अखाद्य लादीचे बर्फ असते. खाण्यायोग्य आईसक्यूब बर्फाचा दर्जा उत्तम असला तरी किंमत जास्त असल्याने विक्रेत्यांना तो परवडत नाही. म्हणूनच 'आईसक्यूब' नावाने ओळखला जाणारा स्वच्छ बर्फ फक्त मोठ्या हॉटेल्स आणि बीअर बारमध्येच दिसतो.

खाद्यपदार्थांमध्ये वापरला जाणारा बर्फ हा खाण्यायुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी हा बर्फ पांढऱ्या रंगाचा असतो जो स्वच्छ पाण्यापासून बनवला आहे, असे स्पष्ट होते. जो बर्फ खाण्यासाठी नसून इतर वापरासाठी असेल तर त्या बर्फामध्ये निळा रंग मिसळून निळसर रंगाच्या लाद्या बनवल्या जातात जी सहजपणे ओळखता येत. विक्रेत्यांनी बर्फ लादी घेताना लायसन्सधारक पुरवठादारांकडूनच बर्फ खरेदी करावा’ त्यात इतर काही गैर आढळल्यास अन्न व औषध प्रशासन मंडळाकडून कारवाई येईल.- शिवकुमार कोडगिरे, सहआयुक्त अन्न व औषधी प्रशासन.

Web Title: Throw away the ice think before ordering Widespread use of inedible ice playing with the health of Punekars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.