मोठी बातमी! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, एक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:28 PM2022-12-10T18:28:58+5:302022-12-10T18:42:54+5:30

आज पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एकाने अचानक शाईफेक केली आहे.

throw ink on chandrakant patil in pune Police arrested one | मोठी बातमी! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, एक ताब्यात

मोठी बातमी! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, एक ताब्यात

googlenewsNext


मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या फुले-आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. आज पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर एकाने अचानक शाईफेक केली आहे, अचानक झालेल्या शाईफेक आणि घोषणाबाजीमुळे गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून वातावरण तापले होते, आता पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  पैठणमध्ये शुक्रवारी कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली, असे विधान केले होते.

नवा वाद! चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळेसाठी फुले-आंबेडकरांनी भीक मागितली

भाजप नेते चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड येथून एका कार्यक्रमातून बाहेर येत असताना अचानक एका व्यक्तीने शाईफेक केली. यावेळी चंद्रकांत पाटील जागेवर धडपडले यावेळी आजूबाजूच्यांनी पकडले. या घटनेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

कालपासून अनेक संघटनांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चंद्रकांत पाटील आज पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते, यावेळी एका व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण झाले होते. 

चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य काय केले होते?

पैठणमध्ये शुक्रवारी कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी शाळेसाठी भीक मागितली, असे विधान केले. शाळा सुरू करताना तुम्ही सरकारी अनुदानावर अवलंबून का राहता? 

डॉ. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी  शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिले नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे ते म्हणाले. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचे स्पष्टीकरण दिले.

यापूर्वीची वादग्रस्त विधाने 
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना, खासदार आहात ना, समजत नसेल, तर घरात बसा, स्वयंपाक करा, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना, मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आपल्याला दुःख झाले, पण आपण दुःख पचवून पुढे गेलो, असे वक्तव्य पाटील यांनी केले होते.  डिसेंबर २०११ मध्ये विधान परिषद निवडणुकीतील विजयानंतर बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली, अटलबिहारी वाजपेयी आणि मोदींनी त्यावर कळस चढवण्याचे काम केले, असे वक्तव्य त्यांनी केले होते. मूठभर शेतकऱ्यांच्यावर कायदे ठरत नसतात, असे म्हणत शेतकरी कायद्याला विरोध करणाऱ्यांवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती.

Web Title: throw ink on chandrakant patil in pune Police arrested one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.