शिवसेनेच्या गटनेत्यांनी उपमहापौरांवर उगारली कुंडी

By admin | Published: August 25, 2015 04:59 AM2015-08-25T04:59:17+5:302015-08-25T04:59:17+5:30

विद्यार्थ्यांकडून पीएमपीच्या पासचा विषय अनुमोदन न मिळाल्याने कामकाजातून वगळण्यात आल्यानंतर ‘त्यावर बोलू द्यावे, मतदान घ्यावे’ अशी मागणी करीत शिवसेनेचे गटनेते

Throwing on the Deputy Mayor by the group leaders of Shivsena | शिवसेनेच्या गटनेत्यांनी उपमहापौरांवर उगारली कुंडी

शिवसेनेच्या गटनेत्यांनी उपमहापौरांवर उगारली कुंडी

Next

पुणे : विद्यार्थ्यांकडून पीएमपीच्या पासचा विषय अनुमोदन न मिळाल्याने कामकाजातून वगळण्यात आल्यानंतर ‘त्यावर बोलू द्यावे, मतदान घ्यावे’ अशी मागणी करीत शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी डायसवर बसलेले उपमहापौर आबा बागुल यांच्यासमोर ठेवलेली कुंडी उचलून त्यांच्यावर उगारली तसेच राजदंड उचलून हातात घेतला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळे सभागृह अवाक झाले. सभागृहातील ज्येष्ठ नगरसेवकांनी लगेच धाव घेऊन हरणावळ यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी वर्गीकरणाचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते. सभागृहाचे कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या नगरसेवकांना बजेटमध्ये योग्य वाटा मिळाला नाही, असा आरोप करीत अशोक हरणावळ यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांसह महापौरांच्या समोरील मोकळया जागेत ठिय्या दिला. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे व इतर सभासदांनी त्यांची समजूत काढून जागेवर बसण्याची विनंती केली.
वर्गीकरणाचे काही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांकडून पीएमपीच्या पाससाठी २५ टक्के रक्कम न घेता त्यांना मोफत देण्यात यावा, हा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिलेला प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. या वेळी सभागृहातील कोणीही या प्रस्तावाला अनुमोदन दिले नाही. हरणावळ यांनी अरविंद शिंदे यांच्याकडे धाव घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रस्तावाला कुणाचेही अनुमोदन न मिळाल्याने हा प्रस्ताव वगळण्यात आल्याचे नगरसचिव सुनील पारखी यांनी घोषित केले, त्या वेळी हरणावळ यांचा पारा चढला. ‘या प्रस्तावावर चर्चा झाली पाहिजे, त्यावर मतदान घ्या,’ अशी जोरजोरात मागणी करण्यास त्यांनी सुरूवात केली. मात्र, नियमानुसार तसे करता येत नसल्याचे पारखी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हरणावळ यांचा तोल सुटला त्यांनी डायसवर धाव घेऊन पारखी यांच्यासमोरील कागद भिरकावून दिले. त्यानंतर महापौरांच्या खुर्चीत बसलेले उपमहापौर आबा बागुल यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यांच्यासमोरील राजदंड उचलून घेतला, तसेच कुंडी उचलून त्यांच्यावर उगारली.
अखेर शिवसेनेच्या सदस्यांचा या प्रस्तावावर निषेध नोंदवून घेऊन या विषयावर पडदा टाकण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Throwing on the Deputy Mayor by the group leaders of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.