घोडेगावला राष्ट्रवादीचे मौनव्रतात धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 11:34 PM2018-10-02T23:34:12+5:302018-10-02T23:34:51+5:30
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारच्याविरोधात घोडेगाव येथील पंचायत समिती कार्यालयाबाहेर मौनव्रत धारण करत धरणे आंदोलन केले.
घोडेगाव : आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारच्याविरोधात घोडेगाव येथील पंचायत समिती कार्यालयाबाहेर मौनव्रत धारण करत धरणे आंदोलन केले. केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक , सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रांत हे सरकार अपयशी ठरले आहे. तसेच स्वातंत्र्य, लोकशाही आणि संवैधानिक सर्वभौमत्व हे भाजपा सरकारच्या काळात धोक्यात आले आहे. म्हणून आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंचायत समिती कार्यालयाबाहेर धरणे आणि मौनव्रत आंदोलन केले.
सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, महिला अध्यक्षा सुषमा शिंदे, संजय शेळके, किरण घोडेकर, दिलीप काळे, सोमनाथ काळे, माऊली घोडेकर, अक्षय काळे, आदेश गाडे, तान्हाजी जंबुकर, गणपतराव इंदोरे, भगवान वाघ, पुरुषोत्तम भास्कर, बाळासाहेब काळे, संजय शिंदे, गोरक्ष मंडलिक, नितीन दरेकर, नामदेव पोखरकर, वैभव मंडलिक, अमोल काळे आदी उपस्थित होते.