निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उद्घाटनाचा धडाका

By admin | Published: July 9, 2016 03:51 AM2016-07-09T03:51:18+5:302016-07-09T03:51:18+5:30

महापालिका जवळ येऊ लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाधिक लक्ष घातले आहे. पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्र्रेसने

The thrust of the inauguration by keeping elections in view | निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उद्घाटनाचा धडाका

निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उद्घाटनाचा धडाका

Next

पिंपरी : महापालिका जवळ येऊ लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाधिक लक्ष घातले आहे. पुन्हा एकहाती सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्र्रेसने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमांच्या निमित्ताने पवार यांनी उद्घाटनांचा धडाका लावला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँगे्रसची एकहाती सत्ता असून, १२८ पैकी ८२ नगरसेवक एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीतही एकहाती सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे केंद्रात आणि राज्यात भाजपा, शिवसेना सत्तेत आल्याने शहरातीलही राजकीय समीकरणेही बदलली आहेत. शहरात भाजपाची ताकत वाढविण्यासाठी शहरातील पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्री दर्जाचे पद व राज्यसभेवर खासदार म्हणून संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीतील अनेक जण इतर पक्षांत जात आहेत. त्यामुळे महापलिकेत पुन्हा सत्तेत येण्यासाठी राष्ट्रवादी कसोशीने प्रयत्न करीत आहे. अजित पवार शहरात अधिकाधिक वेळ देत आहेत. विविध विकास प्रकल्प पूर्ण करण्यासह नवीन प्रकल्पांना सुरुवात केली जात आहे. या प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पवार यांचे शहरात दौऱ्यांवर दौरे सुरू आहेत.
महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे
उद्घाटन व भूमिपूजनासाठी शनिवारी अजित पवार येणार आहेत. चिंचवडगावातील चापेकर बंधू समूहशिल्पाचे अनावरण, गेल्या वर्षी पालिकेकडून घेतलेल्या गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना बक्षीस वितरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानातील भीमसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन यासह
गवळीनगर येथील सखूबाई गवळी उद्यानातील लेझर शो भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)

लेझर शो कशासाठी?
भोसरी : येथील आळंदी रस्त्यावरील सखूबाई गबाजी गवळी उद्यानात शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एक कोटी ऐंशी लाख खर्च करून संगीत कारंजे बनविण्यात येणार आहेत. मात्र, ज्या उद्यानात पाण्याचा कसलाही स्रोत नाही, त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च कशासाठी? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भोसरी सहल केंद्रात ‘लेजर शो’ सुरू करण्यासाठी नागरिकांची मागणी आहे. शिवाय, येथे तुलनेने खर्चही कमी होणार आहे. परिसरातील लहान मुलांचे व नागरिकांचे आकर्षण आहे , तरीही महापालिका या ठिकाणी असा प्रकल्प सुरू करत नाही.

जागेची कमतरता
जागेची कमतरता असताना पाणी उपलब्ध नसताना सखूबाई गवळी उद्यानात लेजर शो कोणाच्या कल्याणासाठी ? असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही. गवळीनगर प्रभागातील आळंदी रस्त्यावर असणाऱ्या सखूबाई गवळी उद्यानात महापालिकेच्या वतीने लेजर शो उभारण्यात येणार आहे. हा लेजर शो तयार करण्यासाठी महापालिकेला संगीत कारंजांबरोबर या कारंजांसाठी लागणाऱ्या मुबलक अशा पाण्याची सोय करावी लागणार आहे. महापालिकेने या कामासाठी एक कोटी ऐंशी लाख एवढा खर्च गृहीत धरला आहे.

पर्यटकांची गर्दी
शहरातील नागरिकांना पुरेसे व नियमित पाणीपुरवठा करणे महापालिकेला अवघड होऊन बसले असताना, फक्त कारंजांसाठी दररोज हजारो लिटर पाणी वाया जाणार आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळ जाहीर करून पिण्याच्या पाण्यासाठी कपात करणारी महापालिका अशा ठिकाणी लेजर शो उभा करण्यासाठी का घेत आहे, भोसरीत सर्व्हे क्रमांक एक या ठिकाणी महापालिकेचे ५.८८ हेक्टर जागेत मोठे भोसरी सहल केंद्र म्हणून उद्यान आहे. या ठिकाणी दररोज तीन ते चार हजार नागरिक भेट देतात. शिवाय, सुटीच्या दिवशी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

Web Title: The thrust of the inauguration by keeping elections in view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.