चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Published: June 30, 2015 12:05 AM2015-06-30T00:05:49+5:302015-06-30T00:05:49+5:30

पूर्व भागातील काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन ठिकाणी घरफोडी करीत एक लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला.

Thunderbolt | चोरट्यांचा धुमाकूळ

चोरट्यांचा धुमाकूळ

Next

मंचर : पूर्व भागातील काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालून तीन ठिकाणी घरफोडी करीत एक लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांच्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत.
काठापूर गावाच्या हद्दीतील भोकरवाडी येथे सदाशिव गणपत जगदाळे राहतात. ते व पत्नी घरासमोरील पडवीत झोपले होते. पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी पडवीत येऊन या दाम्पत्यास मारहाण केली तसेच आवाज करु नका अशी धमकी दिली. दुसऱ्या खोलीत झोपलेले विलास व त्यांची पत्नी आशा यांना चोरट्यांनी मारहाण केली. बारकू जगदाळे यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याला चोरट्यांनी बेदम मारहाण केल्याने उजव्या हाताला व डोक्याला मार लागला आहे. आशा जगदाळे यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याने त्या जखमी झाल्या आहेत. आशा यांच्यावर पारगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
जाताना चोरट्यांनी दारासमोरील मोटारसायकलचा टायर तसेच पेट्रोलची टाकी फोडली. चोरट्यांनी रोहिदास मारुती शेटे यांच्या घराचा दरवाजा तोडला. शेटे यांनाही मारहाण करण्यात आली. शेटे यांना गप्प राहण्यास सांगून दुसऱ्या खोलीत जाण्यास सांगण्यात आले.
त्यांच्या घरातील रोख रक्कम चोरून नेण्यात आली.
संदीप बबन करंडे यांच्या घरातही चोरी झाली आहे. घटनेची माहिती समजताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केल्याची माहिती गोडसे यांनी दिली.

Web Title: Thunderbolt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.