गुरुवारी २०० कोरोनाबाधित : १२३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:10+5:302021-09-10T04:16:10+5:30
पुणे : शहरात गुरुवारी २०० कोरोनाबाधित आढळून आले असून, १२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ...
पुणे : शहरात गुरुवारी २०० कोरोनाबाधित आढळून आले असून, १२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ८ हजार ८६५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.२५ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार २२६ इतकी आहे. आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २१३ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३२ लाख १२ हजार १२८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९७ हजार ६१२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, यापैकी ४ लाख ८६ हजार ४२१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९६५ जणांचा मृत्यू झाला आहे.