गुरुवारी २८६ कोरोनाबाधित : १३३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:56+5:302021-07-02T04:08:56+5:30
पुणे : शहरात गुरुवारी २८६ कोरोनाबाधित आढळून आले असून, १३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ ...
पुणे : शहरात गुरुवारी २८६ कोरोनाबाधित आढळून आले असून, १३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ४८४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४़ ४१ टक्के इतकी आढळून आली आहे़
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा अडीच हजाराच्यांवर गेली असून, आजमितीला शहरात २ हजार ७०४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत़ तर आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ७ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २८५ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४२२ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २६ लाख ७४ हजार ४४९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७८ हजार ८०३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६७ हजार ५०५ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------