गुरुवारी ३३४ कोरोनाबाधित, तर २१२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:42+5:302021-07-16T04:09:42+5:30
पुणे : शहरात गुरूवारी ३३४ कोरोनाबाधित आढळले असून, २१२ जण कोरोनामुक्त झाले. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६९६ ...
पुणे : शहरात गुरूवारी ३३४ कोरोनाबाधित आढळले असून, २१२ जण कोरोनामुक्त झाले. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ६९६ संशयितांची तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४़ ३३ टक्के इतकी आहे़
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या गुरूवारी पुन्हा ३ हजाराच्या पुढे गेली असून, ३ हजार ३३ जण रूग्ण झाले. दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२५ इतकी असून आॅक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या ५१३ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ६२ हजार ६७२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८२ हजार ९१६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७१ हजार २०९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६७४ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------