गुरुवारी कोरोनाबाधित वाढीचा आकडा साडेचरशेच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:26 AM2021-02-20T04:26:40+5:302021-02-20T04:26:40+5:30

पुणे : शहरातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून, पुन्हा नव्या कोरोनावाढीचे आकडे वाढत चालले आहेत़ गुरुवारी ४६५ नवे ...

On Thursday, the coronary growth rate was over one and a half percent | गुरुवारी कोरोनाबाधित वाढीचा आकडा साडेचरशेच्या वर

गुरुवारी कोरोनाबाधित वाढीचा आकडा साडेचरशेच्या वर

Next

पुणे : शहरातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून, पुन्हा नव्या कोरोनावाढीचे आकडे वाढत चालले आहेत़ गुरुवारी ४६५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १०़ ५१ टक्के इतकी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वासातपर्यंत शहरातील विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ४२४ संशयितांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये ४६५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले़ शहरातील सक्रिय रुग्ण संख्याही आता दोन हजाराच्या वर गेली असून, शहरात सक्रिय रुग्ण संख्या आज २ हजार १५६ इतकी झाली आहे़ तर विविध रुग्णालयांत ३०८ रुग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १५४ रुग्ण गंभीर आहेत़ दरम्यान कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण निम्म्यावर आले असून, गुरूवारी १८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़

शहरात आजपर्यंत १० लाख ८५ हजार ५३९ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९६ हजार ३८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८९ हजार ४२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़

==========================

Web Title: On Thursday, the coronary growth rate was over one and a half percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.