पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांना गुरुवारी सुट्टी; पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:21 PM2022-07-13T14:21:21+5:302022-07-13T14:29:57+5:30
हवामान विभागाचा येत्या दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा...
पुणे : गेल्या चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पुणे शहरातील पहिली ते दहावीच्या शाळा राहणार बंद राहणार आहेत. पुणे पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये देखील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत. याबद्दलचा निर्णयाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेने परिपत्रक काढले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. या कारणाने पुण्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय आज पुणे महापालिकेकडून घेण्यात आलाय. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील शाळाही उद्या बंद राहणार आहेत. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस हवामान विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसराला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गरज प्रचंड ट्रॅफिक जॅम होत आहे. अनेक ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडत आहेत. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.