‘ती’चा गणपतीने दिला स्त्रीशक्तीला सन्मान
By admin | Published: September 14, 2016 03:49 AM2016-09-14T03:49:49+5:302016-09-14T03:49:49+5:30
गणेशोत्सवाच्या परंपरेत पुरोगामित्वाचे अभिनव पाऊल टाकत, ‘ती’चा गणपती संकल्पनेच्या माध्यमातून ‘लोकमत’ने स्त्रीशक्तीच्या सृजनशील आविष्काराची मुहूर्तमेढ रोवली
पुणे : गणेशोत्सवाच्या परंपरेत पुरोगामित्वाचे अभिनव पाऊल टाकत, ‘ती’चा गणपती संकल्पनेच्या माध्यमातून ‘लोकमत’ने स्त्रीशक्तीच्या सृजनशील आविष्काराची मुहूर्तमेढ रोवली. स्त्रीशक्तीच्या विविध रूपांप्रमाणेच विविध क्षेत्रांतील महिलांना आरतीचा मान देत ‘ती’चा गणपती उपक्रमाला कृतिशीलतेची जोड दिल्याने गणेशोत्सवात एक नवा पायंडा पाडण्यात आला.
‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपतीला प्रसिद्ध उद्योजिका लीला पूनावाला, अस्मिता जावडेकर, आदित्य जावडेकर, अनिता सणस, फिरोज पूनावाला, सुरेंद्र सणस यांच्यासह टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विश्वस्त प्रणती रोहित टिळक, मिशेल काकडे, विद्या म्हात्रे, मीना नाईक, वैशाली चाटे, कॉँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष मंदा चव्हाण यांनी भेट दिली. या दुर्मिळ संकल्पनेचे कौतुक करीत आगामी वर्षात ‘ती’च्या गणपती ची परंपरा सुरू होईल, असा विश्वास महिलांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी आशा तेजपाल रांका, क्षितिजा आपटे, अरुंधती भिडे, आरती कण्णव, खुशी ललवानी, राजमाला बुट्टे-पाटील, शारदा घाडगे, सुवर्णा अजित सांगळे, मनीषा जगताप, मँगी डबनेर, मंजिरी गोखले, भाग्यश्री देसाई, भक्ती चव्हाण, मधुरा चौधरी, रंजना कोद्रे, सारिका अगज्ञान, रेश्मा दिशी, क्षमा शर्मा, नीलम मितल, माधुरी अभंग, विनीता गुंदेचा, ललिता मुछाल, अंजली सारडा, अर्चना मेहे, आशा खेडेकर, दीपाली जाधव, उमा नामपूरकर, मानसी काळे, भावना गुगळे , साई गुंडेवार, मीना नेरुरकर, रश्मी सेंगर, गौरी सेंगर, सुजाता चव्हाण, वृशाली श्ािंदे, भाग्यश्री खोपडे, अनिता वाळके, सविता निवंगुणे, स्वाती पारगे, शैलजा पिसे, कल्पना भिकुले, विद्या दहाड, उज्ज्वला वाळके, जयश्री निंबळे, मेघा मुंगारे, विदुला गणपुले, पूनम केंडे, श्रद्धा खोपडे, गीता वादवणे, पूजा भिकुले आदी महिलांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती करण्यात आली.
‘ती’चा गणपती संकल्पना खूप प्रेरणादायी आहे. महिला आज सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. पण, या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तिला आरतीचा मान देऊन तिचा सन्मान केला जात आहे.
- आशा तेजपाल रांका
सांस्कृतिक देवाणघेवाणीअंतर्गत परदेशी मुले येतात, त्यांना भारतात आल्यावर सगळीकडे मुलेच का? महिला का दिसत नाहीत, असा प्रश्न पडतो. महिलेला वेगळे स्थान का मिळत नाही. मात्र, आज ‘लोकमत’ने महिलांना शब्दिक नव्हे, तर कृतीतून संदेश दिला आहे
- क्षितिजा मुलंग, यूथ एक्स्चेंज
‘लोकमत’चा उपक्रम महिलांना खूप समाधान देणारा आहे. आज त्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यात आली आहे, असे वाटते. - आरती काण्णव
पुण्यात स्त्रीशिक्षणाला सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केली. ‘लोकमत’ने याच शहरात ‘ती’चा गणपती ही संकल्पना रूजवून एक अभिनव पाऊल टाकले आहे. आयुष्यातील अडचणींवर मात करीत पुढे जाणाऱ्या महिलांचे विघ्न दूर करणारा गजानन त्यांच्या पाठीशी आहे.
- राजमाला बुट्टे-पाटील
‘ती’चा गणपती हा खूप छान उपक्रम आहे. ‘लोकमत’ने आम्हाला आरतीचा मान देऊन आमचा सन्मान केला, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.- शारदा घाडगे
‘ती’चा गणपती खूप सुंदर संकल्पना आहे. गणपतीमध्ये ‘ती’ आहे आणि त्यालाही ‘ती’नेच घडविले आहे. आज दोन्ही शक्ती एकरूप झाल्या आहेत. - क्षितिजा आपटे
‘ती’च्या गणपतीमधून स्त्रीशक्तीचा जागर झाला आहे. ‘ती’चाही सन्मान होतो आहे, याचाच अभिमान आहे.
- अरूंधती भिडे
महिलाच गणपती बसवितात, पूजाअर्चा करतात, याचे कौतुक वाटते. हा उपक्रम असाच उत्तरोत्तर मोठा होवो, ही सदिच्छा.
- सुवर्णा अजित सांगळे
स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने ‘लोकमत’ने टाकलेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. आज महिला अनेक समस्यांना तोंड देत आहेत. ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तिथे ही संकल्पना रूजविण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा.
- नीलम तुटेजा
पुरूषप्रधान समाज मोडीत काढून महिलांना प्राधान्य दिले, याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. गणेशोत्सवात पूजेची, नैवेद्याची थाळी महिला सजवते, पण नैवेद्य दाखविण्याचा मान पुरूषांना मिळतो, हे बोचत राहते. हा विचार सर्वांनी पुढे नेला तर भारत महासत्ता नक्कीच होईल.- विद्या म्हात्रे
दुर्मिळ अशी संकल्पना आहे. महिलाच पौरोहित्य करतात. गणपती बसवितात, ही संकल्पना ‘लोकमत’नेच प्रचलितच केली आहे. हीच परंपरा आगामी वर्षात सुरू होईल आणि काही वर्षांत महिलांची मंडळे सुरू होतील. - मीना नाईक
प्रत्येक उपक्रमामध्ये महिला जीव ओतून जबाबदारीने
काम करतात. पुरुषांमध्ये एवढे समर्पण पाहायला मिळत
नाही. महिलांच्या समर्पित वृत्तीचा प्रत्यय ‘ती’चा गणपती
या उपक्रमातून येत आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी पहिले पाऊल टाकणे खूप महत्त्वाचे आहे.
- मिशेल काकडे
सर्वत्र गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये पुरुषांचा समूह पाहायला मिळतो. मात्र, या उपक्रमातील महिलांचा पुढाकार पाहून
मला खूप आनंद झाला. हे महिलांचे भारतातील पहिले गणेश
मंडळ आहे. यातून आॅलिंपिकमधील महिलांना सलाम करण्यात आला आहे. अनंत काळापर्यंत ही संकल्पना सुरु राहावी, या सदिच्छा.
- खुशी ललवाणी
लोकमान्य टिळक यांच्या कुटुंबातील सून असल्याचा मला अभिमान वाटतो. टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘लोकमत’च्या माध्यमातून पुरोगामित्वाचे बळ मिळाले आहे. स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीला ‘लोकमत’ने या उपक्रमातून छेद दिला आहे.
- प्रणीती टिळक
‘लोकमत’चा ‘ती’चा गणपती हा उपक्रम मनाला खूप भावला. स्त्री सक्षमीकरणाची चळवळ अशीच पुढे सुरू राहावी, यासाठी शुभेच्छा.
- वैशाली चाटे
‘ती’चा गणपती या संकल्पनेमुळे महिलांचे मनोधैर्य वाढले आहे. या माध्यमातून त्यांना भक्कम व्यासपीठ मिळाले आहे. ‘लोकमत’च्या विविध उपक्रमांतून महिलांना नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.
- मंदा चव्हाण
‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपती या उपक्रमामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळाली आहे. यानिमित्ताने महिलांना एकत्र येण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे.
- मॅगी डबनेर
‘लोकमत’ने या उपक्रमातून महिलांना ‘तू भरारी घे’ असा संदेश दिला आहे. या संदेशातून महिलांना नवी ऊर्जा आणि ऊर्मी मिळाली आहे.
- मंजिरी गोखले
आजवर पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान मिळाले आहे. मात्र, ‘ती’चा गणपती या उपक्रमाच्या माध्यमातून तिला प्राधान्य मिळत आहे. स्त्रीमधील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.
- अश्विनी रासकर
मुली आणि स्त्रिया सध्याच्या काळात स्वत:ला सिद्ध करत आहेत. ‘ती’चा गणपती हा उपक्रमही खूप छान आहे. आता प्रत्येक घरात स्त्रीच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करायला हरकत नाही.
- मनीषा जगताप
‘ती’चा गणपती हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. हा उपक्रम रिओ आॅलिंपिकला समर्पित करण्यात आला आहे, हे पाहून खूप छान वाटले. हा स्त्रीशक्तीचा गौरव आहे.- भाग्यश्री देसाई
आजवर स्त्रियांना दुय्यम स्थान मिळत आले आहे. अशा वेळी ‘लोकमत’मधील महिलांनी घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे.
- सारिका अगज्ञान
घरातील सर्व कामे करून नोकरीतील जबाबदाऱ्याही सक्षमपणे पार पाडतात. पावलोपावली त्या स्वत:ची सक्षमता सिद्ध करतात. ‘लोकमत’मधील महिला कर्मचारीही पुढाकार घेऊन धुरा सांभाळत आहेत, हे पाहून आनंद झाला.- भक्ती चव्हाण
पूजेची तयारी आणि मदत करण्याची जबाबदारी स्त्रीकडे असायची. ‘ती’चा गणपतीमध्ये सर्व जबाबदाऱ्या महिला पार पाडत आहेत. या संकल्पनेस शुभेच्छा.- मधुरा चौधरी
चूल आणि मूल या चौकटीतून महिलांनी बाहेर पडण्याची गरज आहे. त्या स्वत:ची प्रगती साधत आहेत, सर्व क्षेत्रांत अग्रेसर आहेत. ‘लोकमत’च्या ‘ती’चा गणपती या उपक्रमातील महिलांचा पुढाकार वाखाणण्याजोगा आहे. - रंजना कोद्रे
आम्हीही महिलांच्या सक्षमीकरणाचे काम करतो. त्यामुळे ‘लोकमत’ही याच संकल्पनेवर काम करीत असल्याचे पाहून आनंद झाला आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी पुढाकार घेऊयात. - अनिता सणस
‘लोकमत’ सर्वांमधील ‘ती’ला सन्मानित करतो आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. येत्या काळात ‘ती’ तिथे ’मी’ या संकल्पनेवर काम करूया. - अस्मिता जावडेकर
‘ती’चा गणपती ही संकल्पना अतिशय उत्तम आहे. ‘लोकमत’ सर्वच बाबतीत अतिशय शांतपणे काम करीत असतो. अशाच पद्धतीने महिलांच्या सबलीकरणाचे प्रमोशन होऊन ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. - लीला पूनावाला