‘त्या’ लाईव्ह कॉन्सर्टला परवानगी नसतानाही तिकिटविक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:04 PM2018-10-20T21:04:59+5:302018-10-20T21:18:00+5:30

लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती.‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. त्यामुळे पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते.

Tickets for live concerts even if they are not allowed | ‘त्या’ लाईव्ह कॉन्सर्टला परवानगी नसतानाही तिकिटविक्री

‘त्या’ लाईव्ह कॉन्सर्टला परवानगी नसतानाही तिकिटविक्री

Next
ठळक मुद्देलक्ष्मी लॉन्सवरील प्रकार : दिलजीत दोसांझचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द ‘तांत्रिक कारणामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे’ असा बोर्ड कार्यक्रम रद्द झाल्याचा मोबाईलवरील संदेशही कार्यक्रम सुरू होण्याअगोदर १० मिनिटे रहिवाशांच्या विरोधामुळे करमणुकीच्या कार्यक्रमांना बंदी 

हडपसर : हडपसर परिसरातील लक्ष्मी लॉन्स येथे करमणुकीचे कार्यक्रम करण्यास परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात तिकिटविक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रसिध्द अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी ७०० ते ५ हजार रुपयांपासून हजारो तिकिटे विकण्यात आली. ऐनवेळी कार्यक्रम रद्द केल्यावर प्रेक्षकांना कळविण्याचे सौजन्यही आयोजकांनी दाखविले नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. 
लक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता ‘मेक ईट हॅपन वुईथ दिलजीत दोसांझ ही ही लाईव्ह कॉन्सर्ट होणार होती. ‘बुक माय शो’वर दुपारपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. पुण्यासह मुंबई आणि इतर भागातून चाहते आले होते. मात्र, ते कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर ‘तांत्रिक कारणामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे’ असा बोर्ड लावण्यात आला होता. कार्यक्रम रद्द झाल्याचा मोबाईलवरील संदेशही कार्यक्रम सुरू होण्याअगोदर १० मिनिटे आला. त्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड मनस्ताप झाला. 
या कार्यक्रमाचे आॅनलाईन बुकींग गेल्या २० दिवसांपासून आॅनलाईन सुरु होते. ७०० रुपये ते ८००० पर्यंत तिकीट होते. सुमारे १५०० चाहत्यांनी  तिकीटे  बुक केली होती. 
रहिवाशांच्या विरोधामुळे करमणुकीच्या कार्यक्रमांना बंदी 
 आयोजकांशी सांगितले कि, असे गाण्याचे कार्यक्रम करण्यास  मगरपट्टा सिटीतील रहिवाशांचा विरोध आहे. त्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली. लक्ष्मी  लॉनवर असे कार्यक्रमास बंदी असल्याचे आम्हाला सांगितले नाही त्यामुळे तिकीट बुकिंग व या कार्यक्रम आयोजन  करण्यात आले . याठिकाणी रहिवाशी झोन असल्याने येथील नागरिकांनी कार्यक्रमाबाबत तक्रार करून असे कार्यक्रम येथे होऊन नयेत अशा आदेश शासनाकडून आणला आहे. यामुळे येथे फक्त लग्न,टूनार्मेंट व शाळेचे इव्हेंट होणार आहेत.
     कॉन्सर्टसाठी  मुंबईहून  काही मुले मुली आल्या होत्या. त्यांना येथे आल्यावर कार्यक्रम रद्द झाल्याचे समजले. तेथे लावण्यात आलेल्या फलकावर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करून सुद्धा काहीच माहिती मिळत नव्हती. तिकीट बुक केलेल्याना ई-मेल व मेसेज वर कार्यक्रम पुढे ढकलल्याचे सांगून आपले तिकिटाचे पैसे ८ ते १० दिवसात परत मिळतील, असे सांगण्यात आले. हा कार्यक्रम डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येईल, असे  आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमात नियोजनासाठी ५० मुलांची टीम बोलावली होती. त्यांना २ वाजता येथे बोलावण्यात आले. या कार्यक्रमातील गदीर्चे नियोजन करण्यासाठी ५०० रुपये देण्यात येणार होते. या बाबत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करून त्यांना सगळी माहिती दिली होती. मात्र कार्यक्रम रद्द झाल्याने या मुलांना बोलावणाऱ्या  व्यक्तीने आपला मोबाईल बंद ठेवला. ती मुले संध्याकाळी ६ पर्यंत त्याची वाट पाहत थांबली होती. 
 हडपसर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे म्हणाले,  या लॉन शेजारी रहिवाशी झोन आहे. येथील नागरिकांच्या पूर्वी पासून अशा कार्यक्रमांना विरोध आहे. त्याच प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा डीजे वर बंदी चा आदेश असल्याने असे  कार्यक्रम येथे होऊ शकत नाहीत . 
एएफएम सोलर सिस्टिमस प्रा. लि. आणि इव्हेंटस या कंपनीच्या वतीने अमोल गरड आणि गुरुमित कौर यांनी अमर मूलचंदानी यांंच्या सहयोगाने या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. धिरेंद्र सेंगर यांची धिरेंद्र आऊटडोअर ही कंपनी आऊटडोअर पार्टनर होती. 

सोशल मीडियावर संताप
आयोजकांनी कार्यक्रम अचानक रद्द करून आम्हाला कळविलेही नाही. त्यामुळे प्रचंड मनस्ताप झाला. आम्ही प्रवास करून येथपर्यंत पोहोचलो होतो. परंतु, आयोजकांनी सौजन्य दाखविले नाही. कार्यक्रम आजच दुसऱ्या ठिकाणी आयोजित करणे गरजेचे होते. आता पुन्हा पुढची तारीख सांगत असले तरी कधी होणार आणि दिलजीतचे चाहते येणार का हा प्रश्न आहे. 
- भावना अहुजा 

Web Title: Tickets for live concerts even if they are not allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.