मंगरूळला बिबट्या पिंजऱ्यात!

By admin | Published: January 1, 2017 04:30 AM2017-01-01T04:30:08+5:302017-01-01T04:30:08+5:30

मंगरूळ (ता. जुन्नर) येथील कोरडेमळा शिवारात शनिवारी सकाळी एक नरजातीचा बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

Tiger cage! | मंगरूळला बिबट्या पिंजऱ्यात!

मंगरूळला बिबट्या पिंजऱ्यात!

Next

बेल्हा : मंगरूळ (ता. जुन्नर) येथील कोरडेमळा शिवारात शनिवारी सकाळी एक नरजातीचा बिबट्या वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
कोरडेमळा येथील रभाजी नामदेव कोरडे यांच्या उसाच्या शेतात वनखात्याने पिंजरा लावला होता. आज सकाळीच वनकर्मचारी आनंदा गुंजाळ, बाळासाहेब खराडे व ग्रामस्थ सकाळी गेले असता, त्यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले.
हा बिबट्या नरजातीचा असून, ७ ते ८ वर्षे वयाचा असल्याचे वनरक्षक बजरंग केंद्रे व वनकर्मचारी आनंदा गुंजाळ यांनी सांगितले.
या परिसरात बिबट्याचा अनेक दिवसांपासून वावर होता. अनेक ग्रामस्थांनी त्या बिबट्याला पाहिले होते. या बिबट्याने या भागातील पाळीव जनावरे खाऊन फस्त केली होती. या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या वेळी परिसरात अद्यापही बिबट्याचा वावर असून, या ठिकाणी लवकरात लवकर पिंजरा लावण्याची मागणी दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Tiger cage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.