टायगर श्रॉफ वाहणार एमजेला नृत्यांजली

By admin | Published: June 22, 2017 06:52 AM2017-06-22T06:52:32+5:302017-06-22T06:52:32+5:30

बॉलिवूडचा ‘मायकेल जॅक्सन’ अशी ओळख असलेला टायगर श्रॉफ आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला अनोखी श्रद्धांजली वाहणार आहे

Tiger Shroff walks Mijela's dancer | टायगर श्रॉफ वाहणार एमजेला नृत्यांजली

टायगर श्रॉफ वाहणार एमजेला नृत्यांजली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बॉलिवूडचा ‘मायकेल जॅक्सन’ अशी ओळख असलेला टायगर श्रॉफ आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला अनोखी श्रद्धांजली वाहणार आहे. २५ जून रोजी पुण्यातील सिझन्स मॉल येथे ‘लोकमत’च्या वतीने प्रथमच मायकेल जॅक्सनच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘मुन्ना मायकेल’ चित्रपटातील कलावंतांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात नृत्यप्रेमींना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
‘हिरोपंती’ आणि ‘बागी’ या सुपरहिट चित्रपटांनंतर टायगर श्रॉफ आणि दिग्दर्शक साबिर खान ही यशस्वी जोडी ‘मुन्ना मायकल’ या पहिल्या डान्स-अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटासाठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीचा दमदार अभिनय पाहावयास मिळणार आहे. अभिनेत्री निधी अगरवाल या चित्रपटाद्वारे पदार्पण करीत आहे. हा बहुचर्चित चित्रपट येत्या २१ जुलै रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. साबिर खानने चित्रपट दिग्दर्शित केला असून, इरॉस इंटरनॅशनल आणि विकी राजानी यांच्या नेक्स्टजन फिल्म्सची निर्मिती आहे. या कार्यक़्रमासाठी रोजरी हे मुख्य प्रायोजक असून फिटनेस मंत्रा सहप्रायोजक आहे. तसेच सिझन्स मॉल व्हेन्यू पार्टनर आहे.

Web Title: Tiger Shroff walks Mijela's dancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.