९० वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शालपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:17+5:302021-04-03T04:10:17+5:30
पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे नाथषष्ठी निमित्त योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदूर यांचे साधनेसमयी ...
पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे नाथषष्ठी निमित्त योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराज इंदूर यांचे साधनेसमयी आसन असलेले ९० वर्षांपूर्वीचे व्याघ्रांबर व शाल यांचे पूजन मंदिरात झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे प.पू.माधवनाथ महाराज हे आध्यात्मिक गुरु होते. त्यामुळे याचे पूजन दरवर्षी मंदिरात करण्यात येते.
या वेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सव उपप्रमुख अॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ यांसह ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिरीष मोहिते आदी उपस्थित होते. शिरीष मोहिते यांच्यातर्फे २०० पाकिटे खिचडीचा प्रसाद देखील वाटण्यात आला.
सुनील रुकारी म्हणाले, योगाभ्यानंद प.पू.माधवनाथ महाराजांची पुण्यतिथी म्हणजे समाधी दिन, हा दिवस नाथषष्ठीचा. प.पू. माधवनाथ महाराजांचा जन्म १८५७ रोजी चित्रकूट येथे झाला. त्यांची नित्य साधने म्हणजेच त्यांनी वापरलेले व्याघ्रासन व शाल रविवार पेठ येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी कै.रंगनाथ नारायण होशिंग-आलेगांवकर यांना दिले.
डॉ.पराग काळकर म्हणाले, हे साहित्य गेली ९० वर्षे येथील पुजारी कै.बाळकृष्ण आलेगांवकर, कै.विनायक आलेगांवकर यांनी जतन केले. त्यांची मुलगी पद्मजा आलेगांवकर व गौरी गुमास्ते, राहुल गुमास्ते, देवेश गुमास्ते यांनी जोपासले असून दत्तमंदिरात दरवर्षी भाविकांना दर्शनासाठी ठेवले जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई यांचे ते अध्यात्मिक गुरू. त्यांच्या प्रेरणेनेच पुण्यातील जगद््विख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती व श्रीमती लक्ष्मीबाई यांनी श्री दत्त मंदिराची स्थापना केली.