टायगरच्या नृत्यांजलीने पुणेकर मंत्रमुग्ध

By admin | Published: June 28, 2017 04:12 AM2017-06-28T04:12:50+5:302017-06-28T04:12:50+5:30

डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला रविवारी सीझन्स मॉल येथे अनोखी श्रद्धांजली वाहिली.

Tigers dance enters Pune | टायगरच्या नृत्यांजलीने पुणेकर मंत्रमुग्ध

टायगरच्या नृत्यांजलीने पुणेकर मंत्रमुग्ध

Next

पुणे : डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ याने आंतरराष्ट्रीय पॉपस्टार मायकेल जॅक्सन याला रविवारी सीझन्स मॉल येथे अनोखी श्रद्धांजली वाहिली. लोकमत व इरॉस इंटरनॅशनल यांच्या सहयोगाने अरान्हाज रोजरी ग्रुप आॅफ स्कूल्स अँड कॉलेजेस् प्रस्तुत ‘एमजेला नृत्यांजली म्हणून डान्स विथ टायगर’ हा कार्यक्रम जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘शेक अँड मूव्ह’ डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी नृत्यप्रेमींनी मायकेल जॅक्सन स्टाईलमध्ये नृत्ये सादर केली.
‘एमजे फाईव्ह’ या सुप्रसिद्ध नृत्य समूहाने या कार्यक्रमात विशेष उपस्थिती दर्शविली. मायकेल जॅक्सन स्टाईलने नृत्य सादर करून या नृत्य समूहाने उपस्थितांची मने जिंकली. शिवगर्जना या ढोलपथकाने ढोलवादन करून टायगर श्रॉफ व निधी अगरवाल या ‘मुन्ना मायकेल’ चित्रपटातील कलाकारांचे स्वागत केले.

टायगर श्रॉफ याने निधी अगरवालसमवेत ‘डिंग डांग’ या गाण्यावर दिलखेचक अदांसह ठेका धरला. पुणेकरांना ‘कसं काय पुणे?’ असा प्रश्न विचारत उपस्थितांना साद घातली. ‘मुन्ना मायकेल’च्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली.
लोकमतचे आभार
लोकमतने आंतरराष्ट्रीय नृत्यसम्राट मायकेल जॅक्सनला अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. याचबरोबर माझा आगामी चित्रपट "मुन्ना मायकेल"चे इतक्या मोठ्या संख्येने पुणेकरांनी उत्साहात स्वागत केले; त्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे आणि माझ्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्मी मिळाली आहे.
- टायगर श्रॉफ, अभिनेता
"मुन्ना मायकेल" चित्रपटातून पदार्पण करतानाच पुणेकरांचे इतके प्रेम मिळाले त्याबद्दल मी इरॉस इंटरनॅशनल व लोकमतची ऋणी आहे. पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्रासोबत मी जोडली गेले आहे, याचा अतिशय आनंद वाटतो.
- निधी अगरवाल, अभिनेत्री
आमच्या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना टायगर श्रॉफने स्वत: भेट दिली व मार्गदर्शन केले त्याबद्दल टायगरला खूप-खूप धन्यवाद आणि त्याच्या "मुन्ना मायकेल"साठी शुभेच्छा. आजच्या पिढीचा आयकॉन असलेल्या टायगर श्रॉफशी भेट आणि त्याच्या नृत्याविष्काराची झलक पाहून पुणेकर भारावले. या कार्यक्रमासोबत जोडलो गेल्याबद्दल मी लोकमतचा आभारी आहे.
- विनय अरान्हा,
विश्वस्त, रोजरी ग्रुप आॅफ स्कूल्स अँड कॉलेजेस्
रविवारच्या संध्याकाळी खरेदीसाठी आलेल्या प्रत्येकाची त्याला पाहण्यासाठी चाललेली तगमग, तुफान गर्दी, प्रचंड उत्सुकता, गाण्यांनी संगीताने भारावलेले वातावरण, सोबत दिल्ली व पुणे येथील डान्स गु्रपने सादर केलेल्या अफलातून नृत्याने प्रेक्षक हरखून गेले होते. आता फक्त नजरा होत्या त्या लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या हिरोपंती फेम टायगर श्रॉफवर.

Web Title: Tigers dance enters Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.