तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; माऊलींचे स्वागत

By admin | Published: June 30, 2016 01:52 AM2016-06-30T01:52:05+5:302016-07-02T12:54:19+5:30

पिंपरी-चिंचवडकरांचा पाहुणचार घेऊन संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाला.

Tikoba's Palkhi departure; Welcome to Mauli | तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; माऊलींचे स्वागत

तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; माऊलींचे स्वागत

Next


पिंपरी : अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी..., अखंडपणे सुरू असणारा हरिनामाचा गजर..., टिपेला पोहोचलेला टाळ-मृदंग...अशा भक्तिमय वातावरणात आणि पिंपरी-चिंचवडकरांचा पाहुणचार घेऊन संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा बुधवारी सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाला.
वारीबरोबर पाऊस आल्याने वारकरी आनंदित झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून आल्हाददायक वातावरण आहे. वारीच्या वाटेवर विठूनामाचा गजर अखंडपणे सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी आकुर्डीत पालखी मुक्कामास होती. देशमुख दिंडीच्या वतीने कीर्तनसेवा झाली. बुधवारी पहाटे पाचला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, गिरीश कुटे, नम्रता कुटे यांच्या हस्ते महापूजा झाली. या वेळी संत तुकाराममहाराज देवस्थानाचे अध्यक्ष शांताराम मोरे, पालखी सोहळाप्रमुख सुनील मोरे, अशोक नि. मोरे, अशोक बा. मोरे, माजी नगरसेवक गोपाळ कुटे आदी उपस्थित होते. आकुर्डीकरांचा निरोप घेऊन वैष्णव वारीची वाट चालू लागले.
ढगाळ वातावरण असल्याने भल्या सकाळपासूनच अधून-मधून हलक्याशा पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे वारकरी आनंदून जात होते. वारकऱ्यांची पावले झपाझप पडत होती.
सोहळा खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन, पिंपरी मोरवाडी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एचए कॉलनीतील विठ्ठल मंदिरात आला. तिथे पहिला विसावा झाला. या वळी नगरसेवक सदगुरू कदम, नगरसेवक अरुण बोऱ्हाडे,
अमीना पानसरे उपस्थित होते. या वेळी
हरिपाठ रंगले होते. वारीच्या वाटेवर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटनांनी स्वागत कक्ष
उभारलेले होते. (प्रतिनिधी)
>भोसरी : ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात, भगव्या पताका खांद्यावर घेत तल्लीन होत, अगदी देहभान विसरून, टाळ-मृदंगाच्या गजरात नाचणारे वैष्णव, मंत्रमुग्ध झालेले भाविक वारकरी व अनोख्या अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी माऊलींचे उद्योगनरीत आगमन झाले.
आळंदी येथील आजोळघरी पहिल्या मुक्कामासाठी पालखी सोहळा विसावला होता. गांधीवाड्यातील आपला पहिला मुक्काम आटोपून बुधवारी पालखी पंढरपूरकडे रवाना होण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाली. पंढरपूरकडे रवाना होण्यापूर्वी पालखी सोहळा पिंपरी- चिंचवड हद्दीत थोरल्या पादुका येथे पहिल्या विसाव्यासाठी थांबला. या ठिकाणी अभिषेक आरती झाल्यांनतर दिघी मॅगझिन चौकात महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्यातील मानकऱ्यांचे व दिंडी प्रमुखांचे स्वागत करण्यात आले. या वेळी प्रत्येक दिंडीचालकाला महापालिकेच्या वतीने विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट देण्यात आली. महापालिकेच्या वतीने महापौर शकुंतला धराडे, आमदार महेश लांडगे, नगरसेवक वसंतनाना लोंढे, नगरसेवक संजय वाबळे, अ‍ॅड. नितीन लांडगे, विश्वनाथ लांडे, नितीन काळजे, जालिंदर शिंदे, चंद्रकांत वाळके, नगरसेविका विनया तापकीर, नगरसेविका अनुराधा गोफणे, नगरसेविका आशा सुपे, नगरसेविका सुनीतामाई गवळी, श्रद्धा लांडगे, नगरसेविका मंदा आल्हाट, शुभांगी लोंढे, स्वीकृत नगरसेवक प्रकाश सोमवंशी, पंडित गवळी, सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, तसेच महापलिकेचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी पालखीच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी आलेल्या हजारो शहरवासीयांनी टाळ्यांच्या गजरात माऊलींचे स्वागत केले. पालखी सोहळा दिघी मॅगझिन चौकात पोहचला. (वार्ताहर)

Web Title: Tikoba's Palkhi departure; Welcome to Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.