टिळकांना अपेक्षित उत्सव व्हावा : रवींद्र वंजारवाडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 03:15 AM2018-10-04T03:15:57+5:302018-10-04T03:16:13+5:30
तालुकास्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धा
पौड : गणेशोत्सव, शिवजयंती यासारख्या सार्वजनिक उपक्रमांच्या निमित्ताने देशातील युवा शक्तीने एकत्र येऊन विधायक कामे करावीत, यासाठी टिळकांसारख्या महापुरुषांनी हे या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप दिले. हे उत्सव आता देशभरात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. हा उत्सव अधिक मंगलमय व्हावा. पर्यावरणपूरक व्हावा. याकरिता मुळशी तालुक्यात आबासाहेब शेळके मित्रमंडळाच्या माध्यमाने स्पर्धा आयोजित करून गणेश मंडळांना दिशा देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी उपजिल्हा अधिकारी रवींद्र वंजारवाडकर यांनी केले.
ते घोटावडे फाटा येथे आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आदर्श गणेश मंडळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना पौड पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी यंदा मुळशी तालुक्यात गणेशोत्सवादरम्यान कोठेही कायद्याचा भंग न होता गणेश विसर्जन शांततेत पार पडले. या स्पर्धांमुळे मंडळांना एक वेगळी दिशा मिळाली आहे. परिणामी तालुक्यात उत्सव कालावधीत एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचा उल्लेख निंबाळकर यांनी केला. यावेळी मुळशीचे तहसीलदार सचिन डोंगरे, शिवसेना संपर्कप्रमुख सत्यवान उभे, कमिन्स इंडिया फाउंडेशनचे प्रशांत चितळे, अनिल व्यास, दिलीप शिंदे, सागर काटकर, सचिन साठे, बाळासाहेब चांदेरे, बाळासाहेब पवळे, बबनराव दगडे, संतोष मोहोळ, स्वाती ढमाले, राम गायकवाड, सचिन खैरे उपस्थित होते.
आबासाहेब शेळके मित्र मंडळ
मुळशी तालुक्यात आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचे हे १० वे वर्ष आहे. पोलीस स्टेशनला नोंदणीकृत असलेल्या ११० गणेश मंडळाना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले होते.
यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे, रवींद्र वंजारवाडकर, सत्यवान उभे, प्रकाश भेगडे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश भेगडे, पोपट ववले, विनोद मारणे, शाकीर शेख, सोमनाथ शिंदे यांनी केले होते. प्रास्ताविक आबा शेळके यांनी तर सूत्रसंचलन ज्ञानेश्वर डफळ यांनी केले.
आबासाहेब शेळके आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत आलेले क्रमांक पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक- तिरंगा मित्र मंडळ, कोळवण, द्वितीय क्रमांक- बालवीर युवक मंडळ पिरंगुट कँप, तृतीय क्रमांक-धर्मवीर संभाजी मराठा मंडळ रिहे, उत्तेजनार्थ- १) सुवर्ण मित्र मंडळ दारवली, २) श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळ गावडेवाडी, ३) जय बजरंग तरुण मंडळ मुकाईवाडी, ४) शिवराज कला-क्रीडा मंडळ कुळे,
५) शिवशक्ती तरुण मित्र मंडळ भुकूम, विशेष प्रावीण्य -
१) भैरवनाथ तरुण मंडळ दारवली, २) श्रीमंत कासारपाटील ट्रस्ट कासार आंबोली, ३) हनुमान तरुण मंडळ पिरंगुट (पवळेआळी), गुणवंत कार्यकर्ते : १) चंद्रशेखर रानवडे (नांदे), २) अक्षय इप्ते (पौड), ३) नंदा सस्ते (पिरंगुट),
४) गौरी गोळे (पिरंगुट), ५) अर्चना सुर्वे (भूगाव).