सीमेवरील जवानांसाठी पुण्यातून तिळगूळ
By admin | Published: January 13, 2017 03:23 AM2017-01-13T03:23:29+5:302017-01-13T03:23:29+5:30
देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांना
पुणे : देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांना मकर संक्रांतीनिमित्त पुण्यातून पहिल्या टप्प्यातील ६० किलो तिळगूळ पाठविण्यात आला.
‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत सैनिकांच्या शौर्याला सलाम करीत स्वातंत्र्यसैनिकांसह तरुणांनी तिळगुळाचे पूजन केले. या उपक्रमात १५ गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत प्रसादे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग कार्यवाह सचिन कुलकर्णी, पोलीस मित्र राजाभाऊ कदम, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, महेश काटदरे, बाबा जसवंते, बाळासाहेब मोरे, भाई कात्रे, रोहित डिंबळे, काटदरे कुटुंबिय उपस्थित होते. आनंद सराफ म्हणाले, ‘‘सीमावर्ती दुर्गम भागात तिळगूळ दर वर्षी पाठविला जात असल्याने सैनिक त्याची आतुरतेने वाट पाहतात. पुणेकरांनी हे तिळगूळ पाठविण्याच्या उपक्रमाचे बीज रोवले असून, ते देशभर पोहोचायला हवे.’’ पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुमार रेणुसे यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)